ई- मार्केट वर लक्ष्य केंद्रित करा सूर्यदत्ताच्या डिझाईनच्या विद्यार्थ्यांना मनी गरबे यांचा सल्ला
पुणे: ” फॅशन क्षेत्राला सध्या ई-मार्केटमध्ये भरपूर वाव आहे. फ्लिपकार्ट, स्नॅपडील अशा वेबसाईटवरून आजकालची पिढी भरपूर विविध फॅशनचे कपडे मागवते. म्हणूनच या क्षेत्रामध्ये नवीन उतरणाऱ्या फॅशनच नाही तर इतर डिझाईनरनेदेखील ई – मार्केट मध्ये कसे उतरता येईल हे बघितले पाहिजे.” असा सल्ला अतुल ओवरसीसचे व किंगफिशर अपीअर्ल्स लंडनचे संचालक तसेच कोर्पोरेट क्षेत्रासाठी ओळखले जाणारे प्रख्यात फॅशन डिझाईनर मनी गरबे यांनी सूर्यदत्ता फाऊनडेशनमध्ये सुरु असलेल्या ‘स्पार्क’ या प्रदर्शनामध्ये दिला. तुमची कितीही कल्पकता डीझाईन क्षेत्रामध्ये असली तरी जर ते डीझाईन विकल्या जात नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही असेही ते विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले.
सूर्यदत्ता फाऊनडेशनमध्ये आजपासून डीझायनिंग क्षेत्रामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या डीझाईनचे ‘स्पार्क’ हे प्रदर्शन सुरु झाले आहे. या प्रदर्शनामध्ये फॅशन डीझाईन, हस्तकला, इनटेरिअर डीझाईन, प्रॉडक्ट डीझाईन अश्या विविध प्रकारच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या डीझाईनचे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन अतुल ओवरसीसचे संचालक मनी गरबे, ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे आणि बार्टीच्या उपजिल्हाधिकारी तसेच सामाजिक न्यायविभागाच्या प्रकल्प संचालक मंजिरी मनोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पत्रकार अशोक वानखेडे म्हणाले की, “आपल्याला जर यशस्वी डीझायनर बनायचे असेल तर तुमचे संवादामध्ये प्रभुत्व हवे. आपल्या ग्राहकाला काय हवे आहे हे चांगल्या पद्धतीने जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद चांगला व्हायला हवा. ग्राहकांचे अनेकदा मत परिवर्तन करता यायला पाहिजे त्याशिवाय तुम्हाला या क्षेत्रामध्ये पुढे जात येणार नाही.” तसेच कुठलेही प्रॉडक्ट बनविताना ते इकोफ्रेंडली बनवा असा सल्लाही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
“प्रत्येक माणसाला देवाने ‘युनिक’ बनविले आहे. त्यामुळे आपल्या ‘युनिक’ बुद्धीचा वापर करून त्यातून उत्कृष्ट काहीतरी बनवा.” असा सल्ला सूर्यदत्ता फाऊनडेशनचे संथापक संचालक डॉ. संजय चोरडिया यांनी दिला.
पहिल्यांदाच सूर्यदत्ताने डिझाईन क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी आपापल्या कल्पकतेने साकार केलेल्या वस्तूंचे ‘स्पार्क’ हे प्रदर्शन ठेवले आहे. हे प्रदर्शन १९ डिसेंबरपासून ते २१ पर्यंत सर्वांसाठी निशुल्क खुले ठेवण्यात आले आहे.