पुणे:
“महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या “इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी’ ने 53 व्या “राष्ट्रीय औषधनिर्माण सप्ताह2014-15′ मध्ये सलग पाचव्यांदा विजेतेपद पटकाविले आहे. “इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन’ (खझअ) ने या ” राष्ट्रीय औषधनिर्माण सप्ताह 2014-15′ चे आयोजन केले होते, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.एन.जगताप यांनी पत्रकाद्वारे दिली.
लोकसभा सदस्य संजय पाटील यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी बी.आर.मासाळ (उपआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे), अनिल इंदुलकर (व्यवस्थापकीय संचालक, आर.पी.एच.कॅलिफोर्निया, यू.एस.ए.), डॉ. आत्माराम पवार (अध्यक्ष, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन, पुणे), सचिन ईटकर (उपाध्यक्ष, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन), प्रशांत हंबर (सचिव, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन) उपस्थित होते.
राष्ट्रीय औषधनिर्माण सप्ताहात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 35 महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. आयोजित एकूण 14 स्पर्धांपैकी 10 स्पर्धांमध्ये “इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी’ ने विजेते तर तीन स्पर्धांमध्ये उपविजेतेपद मिळवून एकूण 1200 गुणांसह “सप्ताहाचे मानकरीपद’ (ॠशपशीरश्र उहराळिेपीहळि) पटकाविले.
एम.सी.ई.सोसायटीचे अध्यक्ष पी.ए.इनामदार, सचिव लतिफ मगदूम, उपसचिव ईरफान शेख, प्रा.व्ही.एन.जगताप, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.