Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

आळंदीत ज्ञानेश्‍वरी भावकथेला प्रारंभ

Date:

unnamed2

पुणे-अधिकमासात तब्बल १८ वर्षांनंतर आलेल्या ‘कोकिळव्रत’ या दुर्मिळ योगाचे महत्त्व विचारात घेऊन पुणे येथील श्रीराम गंगाधरजी परतानी व गणेश विठ्ठलदास सारडा परिवाराने आळंदी येथे अखंड श्री हरिनामसंकीर्तन महोत्सवांतर्गत श्री चांगदेव पासष्टी चिंतन व श्री ज्ञानेश्‍वरी भावकथेचे भव्य आयोजन केले. रविवारपासून या महोत्सवाला सुरुवात झाली आहे.
माउलींच्या समाधी मंदिरापासून भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. या वेळी महिलांचा मोठा सहभाग दिसून आला. ग्रंथदिंडीनंतर वीणापूजन, ग्रंथपूजन, देवतापूजन, भजनारंभ व संतपूजन असे कार्यक्रम घेण्यात आले. त्यानंतर दररोज सकाळी ९ ते ११.३0 या वेळेत होणार्‍या सकाळच्या सत्रातील वारकरी संप्रदायाचे विख्यात अध्वयरूसंत वै. धुंडामहाराज देगलूरकर यांचे नातू व सुप्रसिद्ध व्याख्याते व कीर्तनकार ह.भ.प. श्री चैतन्य महाराज देगलुरकर यांच्या आळंदीतील प्रथमच होणार्‍या चांगदेव पासष्टी चिंतन मराठी भाषेतून श्रवण करण्याची संधी भाविकांना मिळाली. तर, दुपारच्या सत्रात होणार्‍या दुपारी ३ ते सायं. ६.३0 या वेळेतील जगविख्यात भावकथा प्रवक्ते महर्षी वेद व्यास प्रतिष्ठानचे संस्थापक स्वामी गोविंदगिरीजीमहाराज यांचे ज्ञानेश्‍वरी भावकथेचे हिंदी भाषेतील निरुपण श्रवण करण्याची संधी भाविकांनी मिळाली. त्यानंतर दररोज रात्री ८ ते १0 या वेळेत वारकरी संकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्वश्री ह.भ.प. यशोधनमहाराज साखरे, डॉ. रामकृष्णमहाराज लहवितकर, संदीपानमहाराज शिंदे, प्रमोदमहाराज जगताप, जयवंतमहाराज बोधले, ज्ञानेश्‍वरमहाराज साधु, चैतन्यमहाराज देगलुरकर, माधवदासमहाराज राठी या महाराष्ट्रातील नामवंत वक्त्यांचे कीर्तन होणार आहे. ३ जुलैपर्यंत हा महोत्सव होणार आहे.
सनातन हिंदू धर्माच्या परंपरेच्या कालगणनेप्रमाणे साधारणत: ३0 महिन्यांनंतर येणारा हा अधिकमास म्हणून ओळखला जातो. यंदा मात्र हा आषाढ महिना १८ वर्षांनंतर अधिक आषाढ म्हणून आला असून, या पर्वकाळात ‘कोकिळव्रता’चे विशेष महत्त्व असते. या अधिकमासात अधिकस्थ अधिकम् फलम् असल्याने आम्ही या सेवाभावी व्रतातून या महोत्सवाचे आयोजन के ल्याचे श्रीराम परतानी व गणेश सारडा यांनी सांगितले.
दिंडी प्रदक्षिणाने शुभारंभ झालेल्या या महोत्सव शुभारंभप्रसंगी मारुतीमहाराज कुर्‍हेकर, दिनकरमहाराज आंचवल, चक्रांकितमहाराज, भानुदासमहाराज देगलुरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

■ धर्मशाळेच्या भव्य सभागृहात हा महोत्सव सुरू असून महोत्सवात आलेल्या भाविकांसाठी भोजनाची व राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी जयेश कासट, अरुण भालेराव, नवनाथ काशिद, रामभाऊ पारिख, जयप्रकाश सोनी, नारायण मोहन महाराज, आदी मान्यवर अथक परिश्रम घेत आहेत.
■ हिंदू धर्म परंपरेच्या कालगणनेनुसार ३0 महिन्यांनंतर येणारा हा अधिकमास ‘पुरुषोत्तम मास’ म्हणून ओळखला जातो. यंदा मात्र हा आषाढ महिना तब्बल १८ वर्षांनंतर अधिक आषाढ म्हणून आला असून, या पर्वकाळातच ‘कोकिळ व्रता’चे विशेष महत्त्व असते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...