सांगली-/मुंबई-
आर. आर. पाटील यांच्या पार्थिवावर त्यांच्या जन्मगावी अंजनी( सांगली)येथे हेलिपॅड मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यांच्या मुलाने पार्थिवाला मुखाग्नी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह राज्यातील सर्वच पक्षांचे प्रमुख नेते यावेळी त्यांच्या अंत्य संस्कारासाठी उपस्थित होते.सकाळी सुमारे 7.30 च्या सुमारास आबांचे पार्थिव तासगावात दाखल झाले. तासगावातील प्रमुख चौकातून आबांच्या अंत्ययात्रेला अंत्ययात्रेला सुरुवात झाली. भिलवडी नाका चौकातून निघालेली ही यात्रा सिद्धेश्वर मंदिर, गणपती मंदिर आणि विटा नाका मार्गे मार्केटयार्ड येथील मैदानात आबांचे पार्थिव आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव अंजनीत दाखल झाले.याठिकाणी सकाळपासूनच अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांची रांग लागली होती. याठिकाणी अनेक महत्ताचे नेतेही आबांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. त्यासाठी कडक सुरक्षेसर खास व्यवस्था करण्यात आली होती.













