पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयातील ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (एनएसएस) विभागाच्या वतीने नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन हडपसर येथील ‘अक्षय ब्लड बँके’साठी केले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. शैला बुटवाला यांनी केले. या शिबिरामध्ये एकूण 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले, अशी माहिती ‘आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालया’च्या प्रा. नुसरत एस.शेख यांनी दिली.
‘अक्षय ब्लड बँके’च्यावतीने आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाला आणि रक्तदात्यांना प्रशस्तीपत्रक देण्यात आली तसेच रक्तदात्यांना ‘ब्लड ग्रुप कार्ड’ देण्यात आली. लायन्स क्लब, पुणे गॅलक्सी चे अध्यक्ष श्री. दिवेकर यांच्या वतीने रक्तदात्यांना भेटवस्तू देण्यात आली.