पुणे :
‘आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालया’च्या शुभदा जगदाळे आणि दीक्षा पिल्ले या विद्यार्थिनीची पाचव्या आशियाई कनिष्ठ गट सॉफ्टबॉल स्पर्धेत भारतीय संघामध्ये निवड झाली आहे. 19 वर्षांखालील ही सॉफ्टबॉल स्पर्धा दि. 15 ते 20 मार्च 2015 या कालावधीत चयापुम (थायलंड) येथे सुरू आहे.
या स्पर्धेमध्ये भारत, मलेशिया, सिंगापूर, जपान, थायलंड, इंडोनेशिया, चीन असे एकूण 7 संघ सहभागी झाले आहेत. या संघाचे प्रशिक्षण शिबिर कल्याणी (पश्चिम बंगाल) येथे संपन्न झाले.
आझम स्पोर्ट्स अॅकॅडमीचे संचालक गुलजार शेख यांनी या विद्यार्थिनींना मार्गदर्शन केेले. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार आणि सर्व विश्वस्त मंडळातील पदाधिकार्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.