शिवशाहीची पहाट उगवते आहे , मी तयार आहे , तुम्ही तयार आहात ? असा तरुणाईला सवाल करणारे शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे गुरुवारी पुण्यात येत आहेत ,पर्वती विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सचिन तावरे यांच्या प्रचारार्थ 2 ऑक्टोबरला (गुरुवारी) दुपारी 2 वाजता युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त पर्वर्ती मतदारसंघात शिवसेनेतर्फे शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे, असे बाळा ओसवाल यांनी सांगितले.‘आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेनेचा भगवा फडकणार हे निश्चित असून, या सत्तेचा उपयोग गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला ताकद देण्यासाठी केला जाईल,’ अशी ग्वाही पर्वती विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सचिन तावरे यांनी आज दिली. मी तळागाळाशी नाळ जोडलेला कार्यकर्ता असून, आमदार झाल्यानंतरही सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध राहणार आहे, असे आश्वासन त्यांनी दिले.
पर्वती मतदारसंघातील शिवसेनेतर्फे महर्षीनगर येथे महिला मेळाव्याचे आयोजन मंगळवारी करण्यात आले. त्या वेळी तावरे बोलत होते.
उपशहर प्रमुख बाळा ओसवाल, माजी नगरसेवक श्रीकांत पुजारी, कौस्तुभ देशपांडे, नितीन कांबळे, अर्जुन जानगवळी, आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पुढाकाराने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
‘
आदित्य ठाकरे गुरुवारी पुण्यात
Date:

