पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामे निर्माण होण्यास काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारचे धोरण कारणीभूत आहे. नागरिकांनी घरातील सोने-नाणे व जागा विकून बांधलेली अनधिकृत बांधकामे पाडण्याचा प्रश्नच उदभवत नाही. राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचाप्रयत्न केला जाईल. त्यासाठी शहरातील भाजपचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप, एकनाथ पवार आणि चंद्रकांता सोनकांबळे या तीन उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा, असे आवाहन केंद्रीय वाहतूक रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी (दि. ३0) केले.
चिंचवड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आ. लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ चिंचवड, केशवनगर येथील मोरया गोसावी क्रीडांगणात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर चिंचवड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप, भोसरी मतदारसंघातील उमेदवार एकनाथ पवार आणि पिंपरी मतदारसंघातील रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवार चंद्रकांता सोनकांबळे, खेड-आळंदी मतदारसंघातील उमेदवार शरद बुट्टे पाटील, भोर मतदारसंघातील उमेदवार शरद ढमाले, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सदाशिव खाडे, वसंत वाणी, माजी शहराध्यक्ष भगवान मनसुख, महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस उमा खापरे, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, उपाध्यक्ष श्रीनिवास बढे, अँड़ सचिन पटवर्धन, शहर सरचिटणीस राजू दुर्गे, मोहन कदम, कामगार आघाडीचे शहर सरचिटणीस नामदेव ढाके, नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, शीतल शिंदे, माजी नगरसेवक राजेश पिल्ले, अशोक सोनवणे, भाजयुमोचे मोरेश्वर शेडगे आदी उपस्थित होते.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष देशातील सर्वांत मोठे जातीयवादी पक्ष आहेत.जोपर्यंत जनता बाबा, आबा आणि दादा यांच्या गाड्या भंगारात विकत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार नाही.आम्ही गेल्या १00 दिवसांत मुस्लीम समाजाच्या विरोधात एकही निर्णय घेतलेला नाही. जात, पंथ व धर्मावर भाजपला कधीच राजकारण करायचे नाही. त्तसेच विकासाच्या बाबतीत भाजप भेदभाव करणार नाही. मात्र काँग्रेसमुक्त झाल्याशिवाय देशाचे भविष्य घडणार नाही, असे ते म्हणाले.
आ. जगताप म्हणाले, पिंपरी-चिंचवडमधील जनतेने राष्ट्रवादीऐवजी भाजपवर प्रेम केले असते, तर शहराचे शांघाय झाले असते. देशातील सर्वात जास्त दरडोई उत्पन्न असणारे हे शहर आहे. तरीही शहराचा अपेक्षित विकास झालेला नाही. राष्ट्रवादीने शहरातील लोकांना केवळ समस्या दिल्या. आज नागपूर शहराची राज्यातील व देशातील अन्य महापालिकांच्या बरोबर तुलना होते. तशा सुविधा नागपूर शहरात आणल्या. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवडमध्ये सुविधा आणून शहराचे शांघाय होण्याचे प्रय▪करा, असे आवाहन त्यांनी गडकरी यांना केले. तसेच अनधिकृत बांधकामे व अन्य समस्यांमुळे पिंपरी-चिंचवड शहराची जेवढी बदनामी झाली, ती कमी होण्यासाठी प्रय▪करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी भोसरी मतदारसंघाचे उमेदवार एकनाथ पवार, पिंपरी मतदारसंघाच्या उमेदवार चंद्रकांता सोनकांबळे, खेड-आळंदी मतदारसंघाचे उमेदवार शरद बुट्टे-पाटील व माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपचे शहर सरचिटणीस मोहन कदम यांनी केले.