येत्या १४ एप्रिल २०१६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२५ वी जयंती असून त्या दिवशी दिनांक १३ व १४ पुणे शहरातील सर्व दारू दुकाने , परमिट रूम , बियर बार , बेकादेशीर धंदे बंद ठेवावीत , अशी मागणी त्याचप्रमाणे सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयातून सक्तीने जयंती साजरी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून द्यावेत . मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी सौरव राव यांना देण्यात आले .
जिल्हाधिकारी सौरव राव यांनी सांगितले , कि यंदाची जयंती राज्य शासन आदेशानुसार साजरी केली जाईल . आपल्या मागण्याचे निवेदन शासनास कळविले जाईल , त्याप्रमाणे सर्व शासकीय कार्यालयांना आदेश पाळावे लागतील असे जिल्हाधिकारी सौरव राव यांनी शिष्टमंडळास सांगितले .
यावेळी शिष्टमंडळामध्ये शशिकांत भिसे , विलास चौरे , दीपक ओव्हाळ , बाळासाहेब बनसोडे , संजय भिमाले , शाम गोरे , जनार्दन जगताप , संजय सोनवणे , मौलाना इब्राहीम , मयुर मेमाणे , सायना गायकवाड , नितीन साळवे , अशोक जगताप , सचिन शिंदे , सारंग रोकडे , विष्णू काकडे , दीपक बनसोडे आदी समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते .