पुणे- अहो … साहित्य परिषदेचा निवडणूक कार्यक्रम बेकायदा आहे हो ….अशी हाकोटी आता खुद्द परिषदेचे कायदा सल्लागारऍड. प्रमोद आडकर यांनी आज सायंकाळी घाईघाईत पत्रकार परिषद घेवून दिली आहे . साहित्य परिषदेचे काही महिन्यांपासून राजकारण म्हणजे ऐकावे ते नवलच… अशा पद्धतीने शिजत असल्याचे स्पष्ट झाले आहे .घटनेचा पेच निर्माण झाला असला तरी त्यावर मार्ग आहे पण मी तो का सांगू ? आता निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांनी यावर मार्ग काढावा असे सांगून … अवमान करणे, डावलण्याचे राजकारण करणे असे आरोप ही आडकर यांनी यावेळी केले आहे .
काल महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे असे सांगत परिषदेचे अध्यक्ष ; कार्याध्यक्ष ‘प्रमुख कार्यवाह यांनी कार्यकारी मंडळाच्या वतीने निवडणुकीसाठी मतदानास पात्र असलेल्या सभासदांची यादी मुख्य निवडणूक अधिकारी ऍड. प्रताप परदेशी यांना दिली. परदेशी यांच्यासह ऍड. सुभाष किवडे व प्रा. सुधाकर जाधवर हेही निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.असेही जाहीर केले त्यानंतर परिषदेचे कायदा सल्लागार प्रमोद आडकर यांनी आज हि प्रक्रियाच बेकायदा असल्याचे म्हटले आहे . पहा ते काय म्हणतात त्यांच्याच शब्दात …