जगप्रसिद्ध गिर्यारोहक डॉ.आनंद बनसोडे याने सुरु केलेल्या वर्ल्ड पीस सेव्हन समिट या जगातील ७ खंडातील ७ सर्वोच्च शिखरे सर करणाच्या मोहिमेतील ५व्या शिखर मोहिमेसाठी नुकतेच अभिनेता फरहान अख्तर याने आनंदला सुभेच्छा दिल्या असून युनायटेड नेशन्सच्या स्त्री-पुरुष समानतेविषयी असलेल्या हीफॉरशी मोहिमेचा लोगो नुकताच मुंबई येथे फरहान अख्तर याच्या हस्ते आनंदच्या हाती सुपूर्त करण्यात आला. यावेळी युनायटेड नेशन्स चे प्रतिनिधी निशिता, आनंदचे गुरु सुरेंद्र शेळके व “मर्द” चळवळीचे प्रतिनिधि उपस्थित होते. ऑस्ट्रेलिया खंडावरील सर्वोच्च शिखराच्या मोहिमेत आनंदने हीफॉरशी या युनायटेड नेशन्स च्या मोहिमेसाठी भारतात प्रथमच कार्य सुरु केले होते यासाठी यापूर्वीच दिल्ली येथे युनायटेड नेशन्स वूमन च्या मुख्यालयाने आनंदला गौरवले होते. आता पुढील अमेरिका खंडातील सर्वोच्च शिखर माउंट मेकिंग्ली मोहिमेसाठी आनंदला त्यांच्यातर्फे सुभेच्छा व त्याच्या मोहिमेसाठी युनायटेड नेशन्स कडून हीफॉरशी चा झेंडा देण्यासाठी फरहान अख्तर च्या मुम्बई येथील राहत्या घरी विशेष अशी भेट घडवून आणली.
अभिनेता फरहान अख्तर हे आपल्या “मर्द” या चळवळीद्वारे स्त्रियांवरील होणारे अत्याचार थांबवण्यासाठी तसेच स्त्री-पुरुष समानतेसाठी काम करत आहेत.आनंदने गिर्यारोहणातील केलेल्या मोहिमा सामाजिक कार्याला समर्पित असून यानिमितानेच आनंदला युनायटेड नेशन्स सोबत अधिक्रुतरित्या यापुढे काम करता येणार आहे. आपल्या गिर्यारोहणातील मोहिमासोबत प्रत्येक मोहीम ही एका सामाजिक विषयासाठी समर्पित करून आनंदने आपले आगळे वेगळेपण दाखवून दिले आहे. यापूर्वी आशियातील सर्वोच्च माउंट एव्हरेस्ट, युरोपातील सर्वोच्च माउंट एल्ब्रूस, आफ्रिकेतील सर्वोच्च माउंट किलीमांजारो व ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च माउंट कोस्कीस्झ्को व इतर १० सर्वोच्च शिखरे सर करून व स्त्री-शिक्षण, स्त्री-पुरुष समानता,पर्यावरण, बेटी बचाव ई अनेक सामाजिक विषय जागतिक स्तरावर नेहून आनंदने अनेक विक्रमही केले आहेत. या त्याच्या कार्याची दखल घेवून जगातील सर्वोच्च संस्था युनायटेड नेशन्सने सतत त्याच्या पाठी कौतुकाची थाप दिली आहे. आनंदची माउंट मेकिंग्ली मोहीम ही बेटी बचाव व युनायटेड नेशन्स च्या हीफॉरशी साठी समर्पित असून सोलापूर मधील उद्योजक श्री. कुमारदादा करजगी यांनी त्याला प्रायोजकत्व दिले आहे.
“लक्ष” मुळे प्रेरणा-आनंद बनसोडे
फरहान अख्तर याना भेटणे सर्वोच्च आनंदाचा क्षण असून त्यांनी निर्मिती केलेला “लक्ष” या चित्रपटामुळेच मला प्रेरणा मिळाली आहे. त्यांना प्रत्यक्ष भेटून हे सांगण्याचे माझे स्वप्नही पूर्ण झाले.याशिवाय युवकांसाठी लक बाय चान्स, भाग मिल्खा भाग, जिंदगी ना मिलेगी दोबारा” असे चित्रपट सतत प्रेरणदायी आहेत. आश्या प्रेरणादायी व्यक्तीसोबत युनायटेड नेशन्स मुळे जुळता आले याचा खूप आनंद वाटतो. आज त्यांना भेटल्यामुळे नक्कीच जास्त प्रेरणा मिळाली असून यापुढेही त्यांच्या “मर्द” तसेच “हीफॉरशी” मोहिमेसाठी काम करण्यासाठी प्रेरणा मिळाली. त्यांनी हातात दिलेला लोगो शिखरावर घेवून जाताना नक्कीच आनंद वाटत आहे.
२४ रोजी मोहिमेचा “Flag ऑफ” कार्यक्रम-
येत्या २५ तारखेला आनंद सोलापुरवरून अमेरिकेला जाणार असून २४ रोजी रविवारी संध्याकाळी श्री.कुमारदादा करजगी यांच्या हस्ते भारताचा झेंडा देवून मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे, असे कुमारदादा करजगी व आनंदच्या स्वप्नपूर्ती फौंउडेशन चे सुरेश नारायणकर यांनी सांगितले. यानंतर आनंद जवळपास १५ दिवस अमेरिकेतील अनेक ठिकाणी भाषण देणार असून याच वेळी येथील वातावरणाशी जुळवून घेण्यास मदत होणार आहे. यानंतर उत्तरेकडे अलास्का येतील बर्फाळ प्रदेशात जावून त्या खंडातील सर्वोच्च शिखर माउंट मेकेग्ली सर करणार आहे.