पुणे : निसर्ग कोणत्याही अडथळयांमुळे थांबत नाही; तो आपल्या प्रयत्नांची उंची वाढवतो
आणि त्यातून मार्ग काढतो त्याच्या या वृत्तीतून माणसांनी आपल्या समस्यांचा जिद्दीने
सामना करायला हवा असा संदेश ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर यांनी यावेळी दिला.
डी.एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लि. तर्फे घेण्यात आलेल्या डीएसके विश्वरंग चित्रकला आणि
फोटोग्राफी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळा काल डीएसके विश्व येथे पार पडला. डीएसके
उद्योगसमुहाचे अध्यक्ष डी. एस. कुलकर्णी,जलसंपदा राज्यमंत्री विजयबापू शिवतारे,
विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर,हेमंती कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते. धायरी परिसरात
सन २००० मध्ये डीएसके विश्व प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली. कुठलाही गृहप्रकल्प
उभारल्यानंतर आमची जबाबदारी संपली, असे आम्ही मानत नाही. येथील ग्राहकांशी आमचे
नाते दृढ करण्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवीत असतो.विश्वरंग चित्रकला आणि
फोटोग्राफी त्याचाच भाग आहे, असे डी. एस. कुलकर्णी यावेळी म्हणाले.
“निसर्गाची स्वतःची एक भाषा आहे, तिला कसलेही बंधन नाही. ती भाषा कलाकार आपल्या
कलेतून व्यक्त करत असतो. त्यातून माणसाचे आयुष्य अधिकाधिक सुंदर, समृद्ध होत
असते,‘‘ अशा भावना व्यंग्यचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी मांडल्या.
किलबिल (बाल गट), जल्लोष (किशोर), रिमझिम (युवा व प्रौढ), सावली (ज्येष्ठ नागरिक) या
चार गटात ही स्पर्धा झाली. सर्व स्पर्धकांच्या चित्र व फोटोग्राफीचे प्रदर्शन डीएसके विश्व स्कूल
येथे दि. १२ व १३ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. यातील चित्रे व फोटोचे
परिक्षण प्रविण ढमे, मोहन देशमुख, मकरंद जाधव, जे. टी. कुंभार, टी. व्ही. भंडारे, सत्यजित
शिंदे, दिलीप पवार या कला शिक्षकांनी केले. उतेजनार्थ विजेत्यांना प्रत्येकी १ हजार तर
पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे २० हजार, १५ हजार आणि १० हजार रुपयांची पारितोषिके
प्रदान करण्यात आली. या स्पर्धेमध्ये चित्र काढण्याचा व छायाचित्रटिपण्याचा आनंद
चिमुकल्यांपासून ते आजी-आजोबांपर्यंत सगळ्यांनी घेतला. विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर
यावेळी पालकांना उद्देशून म्हणाले की मुलांना लौकिक शिक्षणात रस नसेल तर त्यांच्यातील
गुण ओळखून त्यात त्यांना प्रोत्साहन द्या. कारण एका छोट्यारोपट्याला जोपासल्यावरच
त्याचा मोठा वटवृक्ष निर्माण होतो. याचबरोबर त्यांनी मुलांना कला जिद्दीने जोपसून त्यातून
त्यांच्यातील सर्जनशीलता कशी बहरेल याबद्दल मार्गदर्शन केले.
परीक्षकांपैकी प्रवीण ढमे आणि दिलीप पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर राजेश
दामले यांनी सूत्रसंचालन केले.



