Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

हृदयविकाराच्या 4707 रूग्णांना ‘डायल 108’ रुग्णवाहिकेने दिले जीवनदान ! पुणे शहरात 319 रूग्णांना मिळाला लाभ

Date:

पुणे :
 राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणार्‍या ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’च्या ‘डायल 108’ रूग्णवाहिका सेवेद्वारे 4707 हृदयविकाराचा झटका  आलेल्या रूग्णांना अत्याधुनिक रूग्णवाहिकेतील उपचारामुळे आणि वेळीच रूग्णालयात दाखल केल्यामुळे जीवनदान मिळाले ! ही आकडेवारी 26 जानेवारी 2014 ते 31 डिसेंबर 2015 पर्यंतच्या तपशीलानुसार आहे.
‘108’ हा दूरध्वनी डायल केल्यानंतर ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस’च्या सुसज्ज रुग्णवाहिका मदतीला येतात. या रूग्णवाहिकेमध्ये 233 ‘अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट’ रूग्णवाहिका असून, 704 ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ रूग्णवाहिका आहेत.
या आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या संचालनाची जबाबदारी ‘बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेड’ या सेवाक्षेत्रातील अग्रगण्य कंपनीकडे असून, पुण्यातील ‘औंध उरो रुग्णालयात’ या सेवेचे प्रमुख केंद्र व ‘रिस्पॉन्स सेंटर’ आहे.
अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज ‘डायल 108’ रूग्णवाहिकेच्या आप्तकालीन वैद्यकीय सेवेमुळे हृदयविकारासारख्या आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांवर तातडीने उपचार होणे सोपे झाले आहे. 26 जानेवारी 2014  ते 31  डिसेंबर 2015पर्यंतच्या तपशीलानुसार पुणे शहरात 34 हजार 923 जणांना तर संपूर्ण राज्यभरात 5 लाख 93  हजार 356 जणांना या आपत्कालीन रूग्णवाहिका सेवेचा लाभ मिळाला आहे.
‘26 जानेवारी 2014 रोजी सुरू झालेल्या या सेवेत अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा 937 रुग्णवाहिका राज्यभर आहेत. यामध्ये 233 ‘अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट’ रूग्णवाहिका असून, 704 ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ रूग्णवाहिका समाविष्ट आहेत. या अत्याधुनिक वैद्यकीय सेवेसाठी ‘108’ या दूरध्वनी क्रमांकावर डायल केल्यास विनामूल्य सेवा देणारी सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टरांसह येते. अपघात, हृदयविकार, भोवळ येणे, अर्धांगवायू, विषबाधा, आगीत भाजणे अशा अनेक प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये ही रुग्णवाहिका बोलावता येते’, अशी माहिती ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस’चे मुख्य संचालन अधिकारी डॉ. ज्ञानेश्‍वर शेळके यांनी दिली.
31  डिसेंबर 2015 पर्यंतच्या तपशीलानुसार राज्यातील कार्डियाक रूग्णांना दिलेल्या आपत्कालीन ‘108’ सेवेची जिल्हानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे, अहमदनगर (212), अकोला (42), अमरावती (111), औरंगाबाद (237), बीड (54), भंडारा (21), बुलढाणा (105), चंद्रपूर (76), धुळे (80), गडचिरोली (36), गोंदीया (33), हिंगोली (97), जळगांव (189), जालना (64), कोल्हापूर (175), लातूर (81), मुंबई (714), नागपूर (277), नांदेड (292), नंदूरबार (38), नाशिक (196), उस्मानाबाद (85), पालघर (38).परभणी (49), पुणे (319), रायगड (83), रत्नागिरी (79), सांगली (66), सातारा (100), सिंधुदूर्ग (75), सोलापूर (160), ठाणे (229), वर्धा (104), वाशिम (66), यवतमाळ (126).
index
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सरन्याधीश भूषण गवईंचा प्रोटोकॉल न पाळून भाजपा युती सरकारकडून अपमान, आंबेडकरी विचारांचे असल्याने अपमान केला का? : नाना पटोले

सरन्यायाधिशांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार. राज्य...

पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २० मे पासून सुरू

पदविका अभ्यासक्रम नोकरी व उद्योगासाठी उपयुक्त पर्याय; अधिकाधिक विद्यार्थ्यांनी...