‘स्कूल ऑफ बिझनेस, इकॉनॉमिक्स’ (स्वीडन)च्या भारती विद्यापीठ आयएमईडीबरोबर सहकार्य करार
डॉ. सचिन वेेर्णेकर स्वीडन दौर्यावर
पुणे:
‘स्कूल ऑफ बिझनेस अॅण्ड इकॉनॉमिक्स’( लिनस युनिव्हर्सिटी, स्वीडन) आणि भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्ट्यिूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’(आय.एम.ई.डी.) मध्ये व्यवस्थापनशास्त्र प्रशिक्षणासंबंधी सहकार्य करार झाला असून, त्यानुसार भारती विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन वेर्णेकर आणि प्रा. भारतभूषण सांख्ये स्वीडनला रवाना झाले आहेत. दि. 21 ते 28 सप्टेंबरदरम्यान होणार्या स्वीडनमधील दौर्यात ते चर्चा करणार आहेत.
उच्च शिक्षणातील भविष्यातील सहकार्य, प्रशिक्षण कार्यक्रम, विद्यार्थी आणि प्राध्यापक आदानप्रदान उपक्रम याविषयी आराखडा ठरविला जाणार आहे, अशी माहिती ‘आयएमईडी’चे संचालक आणि भारती विद्यापीठ व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन वेर्णेकर यांनी दिली.