समाज बदलण्यासाठी आपण सर्वांनी पुढे आले पाहिजे – जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

Date:

” मी आणि माझे जीवन ” या वृत्तीमुळे समाज बदलत नाही .

 

क्रांतीज्योती महिला विकास संस्थेच्या नामफलकाचे अनावरण जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले . सदाशिव पेठमधील एस. पी. महाविद्यालयाच्या मागीललोकमान्यनगरमधील जॉगर्स पार्कमध्ये हा कार्यक्रम झाला . यावेळी पुण्यनगरीचे महापौर दत्तात्रय धनकवडे , पर्यावरण तज्ञ विश्वंबर  चौधरी , अड. मिलिंद पवार , क्रांतीज्योती महिला विकास संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सोहनी ज्ञानेश डांगे , वासन केअरचे विभागप्रमुख अजय पवार , बाळासाहेब मालुसरे , सुप्रिया कणसे , उद्योजक संजय धनकवडे , सुवर्णस्पर्श ज्वेलर्सचे निलेश वावरे , शंकर मारणे , मराठे   ज्वेलर्सच्या नीना मराठे आदी मान्यवर व महिला भगिनी उपस्थित होत्या .

    यावेळी  जाणीव सामाजिक संघटनेस सन्मान चिन्ह देऊन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याहस्ते अखिल भारतीय जाणीव संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष  प्रा. मधुकर बिबवे यांचा विशेष सन्मान करण्यात आला . तसेच समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २५ महिलांचा सन्मान मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले . कार्यक्रमाच्या शेवटी महिलांसाठी विविध खेळांच्या स्पर्धा पार पडल्या , तसेच लकी ड्राद्वारे बक्षिसांचे वाटप करण्यात आले , महिलांना एक ग्रॅमच्या सोन्याच्या बांगड्या तसेच , भेटवस्तू देण्यात आल्या .

 यावेळी क्रांतीज्योती महिला विकास संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सोहनी ज्ञानेश डांगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात सांगितले कि , गेली सहा वर्षापासून डायमंड महिला बचत गटाच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आले . बचत गटाच्या माध्यमातून महिलासाठी विशेष सामाजिक उपक्रम घेऊन महिलांची ताकद उभी केली . यामध्ये मोफत नेत्र तपासणी , उन्हाळी शिबीर गरजू रुग्णांना मदत , विविध सरकारी योजनाचे महिलांना मार्गदर्शन , सास्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन , दुष्काळ ग्रस्ताना मदत , आदर्श बचत गट पुरस्कार , कागदी पिशव्या प्रशिक्षण , दिवाळी पणती प्रशिक्षण , वृक्षारोपण , खाद्यमहोत्सव आदी कार्यक्रम राबविण्यात आले

    यावेळी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे  यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि , मानवसेवा , जनसेवा हिच ईश्वर सेवा आहे , मानवतेची पूजा हे महत्वाचे आहे . जनता हि सर्वेक्षर आहे . आज स्वामी विवेकानंद जयंती आहे , माझ्या आयुष्यात स्वामी विवेकानदांची प्रेरणा आहे . प्रत्येक माणसाला मनुष्य सेवा करण्यासाठी मनुष्यजन्म मिळाला आहे ,. आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा सेवेसाठी मिळाला आहे . या क्षणामधूनच आनंद प्राप्त केला पाहिजे . जीवनात सेवा नसेल तर जीवनाला काहीच अर्थ नाही . त्यामुळे क्रांतीज्योती महिला विकास संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे . जीवनात आयुष्य नैराश्य येऊ देऊ नका , शुद्ध आचार , विचार , निष्कलंक जीवन , त्याग , अपमान पचवायची ताकद असली पाहिजे , ” मी आणि माझे जीवन ” या वृत्तीमुळे समाज बदलत नाही . त्यामुळे समाज बदल्यासाठी आपण सर्वांनी पुढे आले पाहिजे .

  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत क्रांतीज्योती महिला विकास संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सोहनी ज्ञानेश डांगे यांनी केले तर सूत्रसंचालन अश्विनी जोग यांनी केले तर आभार सीमा महाजन यांनी मानले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धनाबाबत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

पुणे, दि. १८: बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण...

खऱ्या भारताचा शोध घेण्यासाठी उघड्या डोळ्यांनी सामाजिक वास्तव पहा -पद्मश्री गिरीश प्रभुणे

पुणे,:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरचा सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचा...