अमरावती : माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिन म्हणून साजरी करण्यात येते. यानिमीत्त विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी आज राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सदभावना दिनाच्या कार्यक्रमास प्र. अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, प्र. उपायुक्त (सामान्य) ओमप्रकाश अग्रवाल, उपायुक्त (पुरवठा) रमेश मावस्कर, सहाय्यक आयुक्त जे. बी. अपाले, नगर रचनाकार दीपक नागेकर, सहाय्यक नगर रचनाकर, संजय नाकोड, विभागीय आयुक्तांचे स्वीय सहाय्यक महेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.
याप्रसंगी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली सदभावना दिवस प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यानंतर सर्व उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहिली.