मुंबई : सदभावना दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात सामूहिक सद्भावना प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्र्यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
‘मी अशी प्रतिज्ञा करतो की, मी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषाविषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन. मी आणखी अशी प्रतिज्ञा करतो की, आमच्यामधील वैयक्तिक किंवा सामूहिक स्वरुपाचे सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचारविनिमय करुन व सांविधानिक मार्गांनी सोडवीन’, अशी सामूहिक प्रतिज्ञा यावेळी उपस्थितांनी घेतली.
यावेळी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प वाहून अभिवादन केले.