मुंबई- अभिनेता संजय दत्तला दरवर्षी नाताळ व नविन वर्षाच्या काळातच कशी काय सुटी दिली जाते याबाबत चौकशी करणार असल्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) राम शिंदे यांनी म्हटले आहे. संजय दत्तला तीन दिवसापूर्वी 14 दिवसाची फर्लो रजा देण्यात आली आहे. याबाबत काहींनी आक्षेप नोंदवला आहे. संजय दत्तला वारंवार व ठराविक कालावधीतच सुटी कशी काय मिळते? मग तोच न्याय इतर कैद्यांना लागू का होत नाही असा सवाल उपस्थित केला गेला आहे. याबाबत गृहराज्यमंत्री शिंदे यांनी वरील स्पष्टीकरण दिले आहे.
शिंदे म्हणाले, संजय दत्तला मेहरबानी करण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र, संजय दत्तला देण्यात येणा-या रजा व इतर कैद्यांना देण्यात येणा-या रजा यात जर काही तफावत असेल त्याची तत्काळ दखल घेतली जाईल. मात्र, सामान्य कैद्यांप्रमाणेच दर संजय दत्तला सुटी दिली गेली असेल तर इतरांनाही ती दिली जाते का हे तपासावे लागेल, असे शिंदेंनी सांगितले.
संजय दत्तवर जर तुरुंग प्रशासन किंवा इतर यंत्रणांकडून कृपा होत असेल तर त्याबाबत कडक पावले उचलण्याचे शिंदेंनी संकेत दिले. मात्र, सर्वाप्रमाणेच संजयला रजा दिली असेल तर तो त्याचा हक्क असेल व तो केवळ सेलिब्रेटी आहे म्हणून त्याबाबत चर्चा करणे योग्य ठरणार नाही असेही शिंदेंनी अप्रत्यक्ष सुचित केले.
संजयला हवी आणखी 14 दिवस जोडून सुटी- संजय दत्त 23 तारखेला तुरुंगाबाहेर 14 दिवसाच्या सुटीवर आला आहे. त्यानंतर त्याने कुटुंबियांसोबत पीक चित्रपटाचा आनंद लुटला. फोटोग्राफर्स यांना खास पोज देत आपण 8 किलो वजन घडवल्याचे सांगितले होते. संजय दत्त गेल्या वर्षभरानंतर जेलबाहेर आल्याने त्याला आणखी 14 दिवसांची सुटी मंजूर करता येऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन संजय आणखी 14 दिवसाची सुटी मागणार असल्याचे कळते. आता येरवडा तुरुंग प्रशासन, विभागीय आयुक्त व राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे लक्ष राहील