पुणे :
शिवतीर्थ नगर, पौडरोड येथील श्री गणेश मंदिरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्यात आली. मंदिरामध्ये श्रीकांत गोरे (वय 75) यांनी काढलेल्या 25 फूट बाय 20 फूट लांबीच्या श्रीरामाच्या पेंटींग भोवती पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. सुमारे 200 पणत्या यावेळी लावण्यात आल्या. श्रीकांत गोरे यांनी हे पेंटींग काढण्यास सुमारे 10 तास इतका वेळ लागला.
या उपक्रमात संस्थापक माजी मंत्री शशिकांत सुतार, उपाध्यक्ष नगरसेवक पृथ्वीराज सुतार, उत्सव प्रमुख डॉ. संदीप बुटाला, व्यवस्थापक आनंदा अंबरडेकर, मधुकर शिंदे, ॐकार गेहुले सहभागी झाले होते.
संस्थापक माजी मंत्री शशिकांत सुतार यांनी 25 वर्षांपुर्वी खासदार निधीतून बांधलेल्या या श्री गणेश मंदिरामध्ये अनेक धार्मिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. पेशाने इंजिनिअर असलेले श्रीकांत गोरे (वय 75) समाजकार्याची आवड म्हणून पौड रोड येथे गेली 14 वर्षे विद्यार्थ्यांना ड्रॉईंगचे मोफत प्रशिक्षण देत आहेत.