पुणे मेळाव्यातील निर्धार
पुणे :
राष्ट्रीय समाज पक्षाने २०१५-१६ हे वर्ष ‘संघटन शक्ती ‘ वर्ष म्हणून जाहीर केले असून या काळात महाराष्ट्रात गाव -शहर पातळीपर्यंत संघटनात्मक बांधणी करण्यात येणार आहे
रविवारी पुण्यात पक्षाचा राज्यव्यापी ‘निर्धार ‘ मेळावा झाला . त्यावेळी ही घोषणा करण्यात आली . या मेळाव्याला राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष , शहराध्यक्ष ,राज्य कार्यकारिणी सदस्य निमंत्रित करण्यात आले होते .
पक्षाच्या घटनेत नमूद केलेल्या रचनेप्रमाणे राज्यभर गाव ,शहर,तालुका ,जिल्हा पातळीवर पदाधिकारी आणि कार्यकारिणी नियुक्त करण्यात येत आहे . या नव नियुक्त पदाधिकाऱ्यांचा परिचय आणि त्यांच्या कार्यक्षेत्रातील संघटन शक्तीची सद्य स्थितीचा आढावा या निर्धार मेळाव्यात मांडण्यात आला
पक्षाने संघटनात्मक वाढ करण्यासाठी चार महिन्यापूर्वी विभागीय पातळीवर संघटन मंत्री नियुक्त केले असून ते जिल्हा -तालुका पातळीवर संघटन सक्षम करीत आहेत . याशिवाय प्रदेश पातळीवर महिला ,अनुसूचित जाती ,अल्पसंख्य ,युवक आघाड्यांच्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे
संघटन शक्ती वर्षात पक्षाची रचना बळकट करून राज्यातील प्रमुख पक्ष म्हणून उदयास येणे ,हे उद्दिष्ठ ठेवण्यात आल्याचे प्रदेश उपाध्यक्ष दशरथ राउत आणि महासचिव बाळासाहेब दोड्तले यांनी या मेळाव्यात बोलताना सांगितले . राज्यभर सक्रिय सदस्य नोंदणी सुरु असून या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले
मेळाव्याला प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर ,महिला आघाडी अध्यक्ष श्रद्धा भातंब्रेकर ,अनुसूचित जाती आघाडी अध्यक्ष बाळासाहेब हंगारगे ,अल्पसंख्य आघाडी अध्यक्ष मणेर चाचा ,विष्णू चव्हाण ,पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष डॉ उज्वला हाके ,प्रदेश सचिव कैलास कोळसे -पाटील ,दादासाहेब केसकर ,पुणे शहराध्यक्ष देवेंद्र धायगुडे ,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बजरंग खटके उपस्थित होते
९ ओगस्ट क्रांतीदिनी औरंगाबाद येथे पक्षाचा पुढील निर्धार मेळावा असून त्यात पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रशिक्षण याविषयावर प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर विशेष सादरीकरण करणार आहेत
असे प्रदेश उपाध्यक्ष दशरथ राउत यांनी सांगितले