पुणे :
राष्ट्रीय समाज पक्षाच्या तपपूर्ती वर्षानिमित्त 12 वा वर्धापन दिन शनिवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, आमदार निवास समोर , 237 राणी कोटी लाँन टेम्पल रोड , सिव्हील लाईन, नागपूर येथे दुपारी 1 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर यांनी दिली. हा कार्यक्रम मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस, राजकुमार बडोले (सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री महाराष्ट्र राज्य), संजय राठोड (महसूल राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य), चंद्रशेखर बावनकुळे (उर्जा, नवीन व नवीकरणीय उर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या प्रमुख उपस्थित होणार असून, कार्यक्रमाचे उद्घाटन महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या कार्यक्रमात संघटन प्रशिक्षणाबरोबर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.