मोखा ऑटोरायडर्स या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्य असे हिरो ऑटोरायडर्स दुचाकी वाहनाच्या नवीन शो रुमचे उदघाटन हिरो मोटो कॉर्प लिमिटेडचे पश्चिम विभागाचे प्रमुख एन. बालसुब्रमण्यम यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले .
पुणे नगर रोड महामार्गावरील खांदवेनगर मधील गट नंबर २३३५ मध्ये झालेल्या शो रुमच्या उदघाटन सोहळ्याप्रसंगी मोखा ऑटोरायडर्स या शो रुमचे संचालक संतसिंग मोखा , त्यांचे पार्टनर रॉबिनजीत सिंग , लवलीनसिंग व मोखा मित्र परिवार व अन्य मान्यवर उपस्थित होते .
या उदघाटन सोहळ्याप्रसंगी मोखा ऑटोरायडर्स या शो रुमचे संचालक संतसिंग मोखा यांनी सांगितले कि , वाघोली परिसरचा विकास झपाट्याने होत आहे , त्यामुळे या परिसरात हिरो कंपनीचे वाहन खरेदी करण्यास नागरिकांना सोपे जावे त्यासाठी आम्ही वाहन विक्री बरोबरच सर्व्हीसिंग आणि स्पेअर पार्टस विक्री सुविधा ग्राहकांना देणार आहे . सुमारे आठ हजार स्क़ेअर फुट क्षेत्रफळात या शोरूमची उभारणी करण्यात आली आहे .