मुंबई – लोकसभेत महाराष्ट्रात आप चा दारूण पराभव स्विकारणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या हकालपट्टीचा निषेध करत केजरीवाल यांना लक्ष्य करीत आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. भूषण आणि यादव यांच्यावर जे आरोप लावण्यात आले आहेत ते निराधार आहेत, असे नमूद करताना पक्ष भलेही दिल्लीत जिंकला असेल पण राष्ट्रीय स्तरावर राजकीय पर्याय देण्यात पक्षाला पूर्णपणे अपयश आल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत पत्रकार परिषद घेऊनपाटकर यांनी ‘आप’च्या नेतृत्त्वावर तोफ डागत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले
यादव आणि भूषण यांना आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत देण्यात आलेल्या अपमानास्पद वागणुकीचे तीव्र पडसाद उमटत आहेत. केजरीवाल आणि समर्थकांच्या मनमानीविरोधात पक्षातील एक मोठा गट नाराज असल्याचे दिसत आहे. त्यातूनच मेधा पाटकर यांनी बंडाचा पवित्रा घेत ‘आप’ला धक्का दिला आहे.
‘आप’च्या आजच्या बैठकीत जे काही घडले ते दुर्दैवी होते. या घटनेचा आपण तीव्रपणे निषेध करत आहे, असे मेधा पाटकर म्हणाल्या. ‘आप’ या पक्षाचा सध्या तमाशा बनला आहे. पक्षात राजकीय तत्वांची पायमल्ली होत आहे, असा आरोपही मेधा पाटकरांनी केला.
मेधा पाटकरांनी दिली ‘आप ‘ ला सोडचिठ्ठी
Date: