पुणे:
दि. मुस्लिम को-ऑॅपरेटिव्ह बँक लि. पुणेची पंचवार्षिक निवडणुकीत शिक्षणतज्ज्ञ पी.ए. इनामदार यांच्या नेतृत्वाखालील ‘अवामी महाज’ पॅनेल च्या 15 उमेदवार वगळता अन्य उमेदवारांनी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. मुस्लिम बँकेच्या 84 वर्षातील इतिहासात प्रथमच निवडणूक बिनविरोध झाली.
27 मार्च 2015 ही उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख होती. पी.ए.इनामदार यांच्या नेतृत्वाखालील ‘अवामी महाज’ पॅनेलचे 15 उमेदवार वगळता अन्य उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली त्यामुळे ‘अवामी महाज’ पॅनेलचे 15 उमेदवार बिनविरोध विजयी झाले.
1931 साली स्थापन झालेली मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक ही 550 कोटी ठेवी असलेली, राज्यात 27 शाखा असलेली आणि ग्रॉस एनपीए 5 टक्के असलेली अग्रगण्य बँक आहे. शिक्षणतज्ज्ञ पी.ए.इनामदार यांनी मुस्लिम बँकेत संचालक म्हणून प्रवेश केला तेव्हा बँकेच्या ठेवी फक्त 5 कोटी होत्या. आता त्या 550 कोटींवर पोहोचल्या आहेत. पी.ए.इनामदार हे सातत्याने 38 वर्षे निवडून येत असल्याने वरिष्ठ संचालक ठरले आहेत.
‘अवामी महाज’च्या बैठकीत पी.ए. इनामदार आणि विजयी संचालकांना पेढे भरवून अभिनंदन करण्यात आले.
मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक विजयी उमेदवारांची नावे :
पी.ए. इनामदार, शफी दिल्लीवाले (बँकेचे विद्यमान अध्यक्ष), अॅड. शेख महबूब इलाहीबक्ष, खान लुकमान हाफिजुद्दिन, सय्यद अली रझा इनामदार, अझीम गुडाखूवाला, खान खुदादोस्त मुस्तजाब खान, एस.एम. इक्बाल, शेख चिरागुद्दीन नुरुद्दीन, शेख मुनव्वर रहिमतुल्ला, काझी मुमताझ सय्यद, इनामदार तबस्सुम शौकत, तडवी डी. आर. (अनुसूचित जाती), सय्यद अल्लताफ हैदर (इतर मागासवर्गीय), शिकलगर इम्तियाझ काजी (भटक्या