मुंबई- सीबीआय आणि अन्य यंत्रणा या सरकारच्या ताटाखालचे मांजर बनून राहतात असे आजवर आपण ऐकत आलो पण आता इंडिअन एक्स्प्रेस या दैनिकातील एका बातमीने तर खळबळ उडविली आहे . महाराष्ट्रात 2008 साली नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणातील आरोपींना वाचविण्यासाठी केंद्रातील एनआयए म्हणजे राष्ट्रीय तपास यत्रंणेकडून आपल्यावर दबाव आणला गेल्याचा गंभीर आरोप या प्रकरणाच्या विशेष सरकारी वकील रोहिणी सॅलियन यांनी केला आहे. असे वृत्त या इंग्रजी दैनिकाने प्रसिध्द केले आहे एनआयए अधिका-याचा सल्ला धु़डकावून लावल्याने रोहिणी सॅलियन यांच्याऐवजी दुस-या वकीलाची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. सॅलिअन 2008 पासून या खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम बघत होत्या. यावर त्या म्हणाल्या, या प्रकरणी मी महाराष्ट्र सरकारची बाजू मांडावी असे वरिष्ठांना वाटत नाही असा आरोप केला.
‘इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना रोहिणी सॅलियन यांनीच हा गौप्यस्फोट केल्याने मोदी सरकार मालेगाव स्फोटातील कडव्या हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना वाचविण्याचा केविलवाणी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.रोहिणी सॅलियन म्हणाल्या, मालेगाव स्फोटातील आरोपींबाबत जरा मवाळ धोरण स्वीकारा असा संदेश आपल्याला राष्ट्रीय तपास यत्रंणाकडून देण्यात आला. मोदी सरकार आल्यानंतरच्या काळानंतर असले प्रकार सुरु झाल्याचेही सलियन यांनी सांगितले.

29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटात 4 जण ठार झाले होते तर, 79 लोक जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटानंतर त्याचा तपास करताना राष्ट्रीय तपास यत्रणांच्या हाती धक्कादायक माहिती लागली. हे बॉम्बस्फोट कडव्या हिंदुत्ववादी संघटनानी घडवून आणल्याचे तपासात स्पष्ट झाले. याप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, सुनील जोशी यांच्यासह एकूण 12 जणांना अटक करण्यात आली होती. यातील सुनील जोशीचा मृत्यू झाला आहे तर ठाकूर व पुरोहित अद्याप तुरुंगात खितपत पडले आहेत. यातील आरोपींना विनाकारण गोवण्यात आल्याचे उजव्या विचारसरणीच्या संघटनांचे म्हणणे आहे.
दरम्यान, मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर कर्नल प्रसाद पुरोहित यांनी मोदींनी एक पत्र लिहले होते. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनीही आपण लवकरच जेलबाहेर येऊ असा विश्वास व्यक्त केला आहे. यामागे केंद्रात व राज्यात भाजप सत्तेत असल्याचे कारण दिले जात आहे. आता या आरोपींना सोडवण्यासाठी खुद्द तपास यत्रणांच सरकारी वकिलांवरच दबाव आणत असतील तर चिंतेची बाब आहे.