बिबट्याच्या तावडीतून धाकट्या बहिणीला वाचवले, नगरच्या अश्विनीला बालशौर्य पुरस्कार

Date:

अहमदनगर -आदिवासी भागात बिबट्यांचा वावर व त्यांच्याकडून नागरिकांवर होणारे हल्ले नवीन नाहीत. मात्र, बिबट्याच्या तावडीत अडकलेल्या लहान बहिणीची जिवाची पर्वा न करता सुटका करण्याचे धाडस नगर जिल्ह्यातील अश्विनी बंडू उघडे हिने दाखवले होते. तिच्या या पराक्रमाची राष्ट्रपती भवनाकडून दखल घेण्यात आली असून तिला यंदाचा बालशौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. २६ जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते अश्विनीला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील मेहेंदुरी (ता. अकोले) येथील बंडू उघडे हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरर्निवाह करतात. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. ९ जून २०१४ ला ते नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास झेंडूच्या शेतीला पाणी भरत होते. त्याच वेळी त्यांच्या अश्विनी व रोहिणी या दोन मुली आंबे गोळा करत होत्या. याच वेळी शेजारच्या उसाच्या शेतातून आलेल्या बिबट्याने रोहिणीवर हल्ला केला. ती प्रचंड घाबरली व जिवाच्या आकांताने ओरडू लागली. तिचा टाहो ऐकताच ११ वर्षीय अश्विनीने घटनास्थळी धाव घेतली. समोर बिबट्या रोहिणीचा पाय ओढत असल्याचे तिला दिसले. हे दृश्य पाहताच क्षणाचाही विचार न करता अश्विनीने बिबट्याचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली. आरडाओरड सुरू असल्याने त्यांच्या वडिलांनीही धाव घेत बिबट्याला हुसकावून लावले. या हल्ल्यात रोहिणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला रुग्णालयात दाखल केल्याने तिचे प्राण वाचले. या घटनेची राष्ट्रपती भवनाने दखल घेतली असून अश्विनीला तिच्या शौर्याबद्दल केंद्र सरकारचा बालशौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
बालशौर्य पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अश्विनी व रोहिणी या दोन्ही बहिणींनी आनंद व्यक्त केला आहे. २६ जानेवारीला अश्विनी, वडील बंडू उघडे, शिक्षक डी. एस. वैरागकर राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणार आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पिंपरी चिंचवडकरांनी अनुभवाला लोकसंस्कृतीचा कलाविष्कार – आ. उमा खापरे

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक...

राजकुमार ठाकूर यांनी मिळविला सहस्रबुद्धे चषक कॅरम स्पर्धेत विजय आणि ठरले चषकाचे मानकरी

पुणेपटवर्धन बाग येथील डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाजवळ असलेल्या एरंडवणे...

मोगलमर्दिनी छत्रपती महाराणी ताराबाई साहेबांच्या समाधी संवर्धन करावे यासाठी मुख्यमंत्री यांना पत्र…

पुणे-मोगलमर्दिनी छत्रपती महाराणी ताराबाई साहेबांच्या समाधी संवर्धन करावे यासाठी...

छत्रपती राजाराम महाराज सृष्टी प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न

पुणे-शिवपुत्र श्री राजाराम छत्रपती महाराजांच्या ३२५ व्या पुण्यतिथी निमित्त...