Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुण्याचा पाहुणचार घेवून संत निघाले पंढरीला ….

Date:

माऊलींची पालखी दिवे घाटात पोहोचली तेव्हा राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचा सेल्फी
माऊलींची पालखी दिवे घाटात पोहोचली तेव्हा राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचा सेल्फी
हडपसर मध्ये पालख्यांचे उत्स्फूर्त भव्य स्वागत झाले
हडपसर मध्ये पालख्यांचे उत्स्फूर्त भव्य स्वागत झाले
माजी महापौर चंचला कोद्रे यांनी वारीचे केलेलं स्वागत आणि पाहुणचार
माजी महापौर चंचला कोद्रे यांनी वारीचे केलेलं स्वागत आणि पाहुणचार

11059593_469482763227775_5502936524559712558_n 11693809_469483676561017_6103613437059397359_n

पुणे –  साधु संत येती घरा, तोची दिवाळी दसरा अशा आनंदी वातावरणात ज्ञानोबा -तुकाराम आणि अन्य संतांच्या पालख्यांचा पुणेकरांनी उत्कट भावनेने पाहुणचार केला.आज सकाळी  ज्ञानोबा माउली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांना  भक्तिभावाने पंढरपूरकडे मार्गस्थ हि केले   आज सकाळी दोन्ही पालख्या पुण्याहून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत.
शनिवारी माऊलींनी पुण्यामध्ये मुक्काम केल्यानंतर रविवारी सर्व संत मंडळींच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या. नाना पेठेत मुक्कामी असलेली संत तुकाराम महाराजांची पालखी सकाळी साडे सहा वाजता पुढील मार्गक्रमणासाठी रवाना झाली. तर भवानी पेठेत मुक्कामी असलेली संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सकाळी सहा वाजता मार्गस्थ झाली.
आज सकाळी संत ज्ञानेश्‍वरांच्या पालखीची शिंदे छत्रीजवळ परंपरागत आरती झाली. त्यानंतर हडपसरमध्ये अल्पविश्रांती घेण्यात आली  आज सकाळी संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसरमधील अल्पविश्रांतीनंतर सोलापूर रस्त्याने पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली संत ज्ञानेश्वरांची पालखी आज दुपारी अडीच वाजता दिवेघाटापर्यंत पोचली आज ती सासवड यथे मुक्कामी असेल .
विठ्ठलनामाच्या गजरातील उत्साही वातावरणात पालखी आगेकूच करत आहे. पालखीच्या पुण्यातील वास्तव्यात पुणेकरांनी प्रचंड उत्साहात पालखीचे स्वागत केले होते.  आजही  पालखी सोहळ्यात पुणेकरांनी गर्दी केली आहे. विशेषत: तरुणांची उपस्थिती लक्षणीय आहे. आज अधिकमासातील कमला एकादशी असल्याने वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालख्या हडपसरपर्यंत एकत्र होत्या . तेथून पुढे वेगळ्या वाटेने दोन्हीही पालख्या पांडुरंगाकडे धावघेतली . संत तुकारामांची पालखी सकाळी पावणे दहा वाजता हडपसरमध्ये पोचली. तर अल्पशा विश्रांतीनंतर सोलापूर रोडने पुढील प्रवासासाठी रवाना झाली. तर संत ज्ञानेश्वरांची पालखी सकाळी पावणे दहाच्या सुमारास सासवड मार्गे निघाली.
दोन्हीही पालख्यांनी हडपसरमध्ये अल्पविश्रांतीसह अल्पोपहार घेतला. एकादशीच्या निमित्ताने बहुतेक वारकऱ्यांना उपवास असल्याचे ठिकठिकाणी विविध संघटना, संस्थांच्यावतीने उपवासाच्या अल्पोपाहराचे वितरण करण्यात आले. दिवेघाटातील 33 किलोमीटरचा विनाथांबा प्रवास असल्याने संत ज्ञानेश्वरांच्या पालखीतील आजचा दिवस वारकऱ्यांसाठी सत्वपरीक्षा असल्याचे मानले जाते. तर शनिवारी आपला नगर जिल्ह्यातील डोंगलगाव येथील मुक्कामानंतर संत निवृत्तीनाथांची पालखी पुढे मार्गस्थ झाली आहे.

शिवसेनेचे शहराध्यक्ष विनायक निम्हण यांनी पालखी पुण्यात असताना वारकऱ्यांना उपयोगी वस्तूंचे वाटप केले
शिवसेनेचे शहराध्यक्ष विनायक निम्हण यांनी पालखी पुण्यात असताना वारकऱ्यांना उपयोगी वस्तूंचे वाटप केले

1505621_1079354738759846_4714969544735843777_n

महेश वाबळे यांनी वारकऱ्यांसाठी  भोजन समारंभ ठेवला होता
महेश वाबळे यांनी वारकऱ्यांसाठी भोजन समारंभ ठेवला होता
नगरसेवक सुभाष जगताप  यांनी वारकऱ्यांसाठी  भोजन समारंभ ठेवला होता
नगरसेवक सुभाष जगताप यांनी वारकऱ्यांसाठी भोजन समारंभ ठेवला होता

11705247_593577144078431_3656149707244299837_n

माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी वारकऱ्यांसाठी  भोजन समारंभ ठेवला होता
माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी वारकऱ्यांसाठी भोजन समारंभ ठेवला होता
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लवकरच जाहीर होणार गट क लिपिक व टंकलेखक परीक्षेचा अंतिम निकाल

https://www.youtube.com/live/fFVATRwAxP4?si=7g1Z8-YHQWZYClCS एमपीएससीच्या कारभारावर आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत लक्षवेधी मुंबई/ पुणे...

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन शिक्षेत वाढ:सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या विधेयकाचे झाले काय?

दारूबंदी सुधारणा विधेयक 2025 घेतले मागे... मुंबई-सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून...

दारुबंदी विधेयक सुधारणेसाठी सभागृहात आमदार महेश लांडगे यांनी मांडली आक्रमक भूमिका

कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांचे सर्वंकष उपाययोजनांचे निर्देश मुंबई/ पिंपरी-चिंचवड...

चाकूर च्या माजी नगराध्यक्षांसह शरद पवार गट, ‘प्रहार’ च्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत मुंबई, 11 जुलै...