Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुणे लष्कर भागात सात तासात शांततापूर्ण वातावरणात विसर्जन मिरवणूक संपन्न

Date:

1 2 3 4

पुणे लष्कर भागात सात तासात शांततापूर्ण वातावरणात विसर्जन मिरवणूक संपन्न झाली . लष्कर भागातील मानाचा समजला जाणारा कामाठीपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीचा प्रारंभ सेंटर स्ट्रीटवर परिमंडल २ चे पोलिस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले . यावेळी लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीषक बरकत मुजावर , कामाठीपुरा मंडळाचे अध्यक्ष प्रसाद केदारी व अन्य मान्यवर उपस्थित होते . या कामाठीपुरा मंडळाने विद्युत रोषणाईच्या सजावटीत आपल्या श्री ची मूर्ती विराजमान केली होती . या मंडळाच्या  कार्यकर्त्यांनी भगवे फेटे घातल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत होते . या मंडळानतर पापा वस्ताद वीर शैव लिंगायत गवळी समाज गणेशोत्सव मंडळ . ताबूत स्ट्रीट गणेशोत्सव मंडळ , हिंद तरुण मंडळ , नवयुग तरुण मंडळ , श्री गणेश उत्सव मंडळ , शिवशक्ती कमलमळा तरुण मंडळ , आशीर्वाद मित्र मंडळ , नवयुग सुवर्णकार मित्र मंडळ , सुयोग मित्र मंडळ , धोबीघाट मित्र मंडळ ट्रस्ट , उत्सव सवर्धंक संघ , कुंभारबावडी स्थायिक सेवा मंडळ , राजेश्वर तरुण मंडळ , श्रीकृष्ण तरुण मंडळ , नंदनवन तरुण मंडळ , कुंभारबावडी तरुण मंडळ , नवमहाराष्ट्र व्यायाम मंडळ , श्री नवचैतन्य मंडळ , श्री साईनाथ गणेशोत्सव मंडळ , अशोक चक्र मंडळ आदी मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाली होती .

   यामध्ये हिंद तरुण मंडळाने पंजाबी गीतांवर भांगडा नृत्य सादर केले . तरुण हिंद गर्जना पथकाने भोपळे चौकात सर्वाचे लक्ष वेधून घेतले . श्री साईनाथ मंडळाने फुलांच्या सजावटीत श्री ची मूर्ती विराजमान केली होती . साईनाथ मंडळ दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील पुणे शहरातील टिळक रोडवरच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते . अनेक मंडळानी फुलांची सजावट केली होती . कामाठीपुरा स्थायिक मंडळाने एल ई डी मधील स्टारचा विद्युत रोषणाईचा देखावा सादर केला . तर पापा वस्ताद मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आपल्या पारंपारिक नृत्याने मिरवणुकीत कार्यकर्ते सहभागी झाले .

   विसर्जन मार्गावर सेंटर स्ट्रीट पोलिस चौकीसमोर पुणे कॅंटोन्मेंट शांतता समितीने सर्व गणेश मंडळाचे श्रीफळ आणि पुष्पगुछ देऊन समितीचे अध्यक्ष बापूसाहेब गानला यांच्याहस्ते स्वागत केले . तर अल कुरेश व्यापारी संघटनेच्यावतीने कुरेश नगरचौकात सर्व गणेश मंडळाचे श्रीफळ आणि पुष्पगुछ देऊन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अबरार कुरेशी व पुणे शहर अध्यक्ष हसन कुरेशी यांच्याहस्ते स्वागत केले . पुलगेट पोलिस चौकीमध्ये पोलिस मित्र संघटना पुणे कॅंटोन्मेंट  विभागाच्यावतीने पोलिस बांधवाना अल्पोहाराची पाकिटे संघटनेचे पुणे कॅंटोन्मेंट  विभागाचे अध्यक्ष मनीष सोनिग्रा यांच्याहस्ते करण्यात आले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मतचोरी लपवण्यासाठीच ४५ दिवसात सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय.

मुख्यमंत्री फडणविसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ,...

बेरोजगारांना रोजगार मिळो आणि महिला अत्याचार कमी व्होवो”

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पांडुरंगाकडे प्रार्थना. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन...

वारीच्या सोहळ्यात चोरट्यांच्या टोळ्या पकडून ४३ लाखाचा ऐवज हस्तगत

पुणे- श्री. संत ज्ञानेश्वर महाराज व श्री. संत तुकाराम...

सूक्ष्म सिंचन घटकाकरिता अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. 23: राष्ट्रीय कृषी विकास योजना- प्रती थेंब...