मुंबई -काँग्रेस नेतेनारायण राणेंच्या निकटवर्तीयाच्या खुनाचा प्रयत्न रिव्हॉल्वर नादुरुस्त झाल्याने फसला नारायण राणे यांचे निकटवर्ती मानल्या जाणाऱ्या गणेश कासवणकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोराने कासवणर यांच्यावर रिव्हॉल्वर रोखले पण ते लॉक झाल्याने त्याला पळ काढावा लागला. रविवारी भरदिवसा ही थरारक घटना घडली…
एल्फिस्टनच्या रेल्वे पुलावरून गणेश कासवणकर चालले होते. पुलाच्या मध्यभागी येताच अचानक एकजण मागून आला आणि त्याने खांद्यावर हात ठेवत छातीला रिव्हॉल्वर लावली. त्याने लगेचच ट्रिगर दाबले पण रिव्हॉल्वर लॉक झाली. या घटनेने मला धक्का बसला. मात्र त्याचवेळी त्याला जोरात झटका दिल्याने तो हल्लेखोर पुलाच्या कठड्यावर आपटला. आणि पुलावरून धावतच मी खाली आलो, अशी माहिती कासवणकर यांनी दिली.
पुलावरून उतरताच मी लोकांना मदतीचं आवाहन केलं आणि मोठी गर्दी जमा झाली. काही मिनिटात एक दुचाकी स्वार आला आणि हल्लेखोर त्याच्या पाठिमागे बसला. दोघे प्रभादेवीच्या दिशेने गेले. आणि त्यानंतर पोलिसांना तिथूनच फोन केला, असं कासवणकर म्हणाले. परळ पुर्वेला ते राहतात.
दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी पंचनामा केला आहे आणि परिसरातील सीसी टी व्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. या प्रकरणी अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विविध ठिकाणच्या सीसी टी व्ही फुटेजची पडताळणी केली जात आहे. तसंच कासवणकर यांच्या माहितीनुसार हल्लेखोराचे स्केच आम्ही तयार केले आहे. आणि माहितीसाठी सूत्रांना पाठवण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
नारायण राणेंच्या निकटवर्तीयाच्या खुनाचा प्रयत्न रिव्हॉल्वर नादुरुस्त झाल्याने फसला
Date: