पुणे-नागरी सहभागातून सार्वजनिक स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्याच्या अभिनव उपक्रमास एक वर्ष यशस्वी रित्या पूर्ण झाले हे कौतुकास्पद असून शहारतील इतर बांधकाम व्यवसायिक व अन्य व्यापरी वर्गाने तसेच उद्योजकांनी ही पुढे यावे व प्रत्येकी एक एक स्वच्छतागृह दत्तक घ्यावे जेणेकरून शहारतील सर्वच ७०० ते ८०० सर्वजनिक स्वच्छतागृह कायम स्वच्छ राहातील आणी पुणे शहाराच्या सौंदर्या बरोबरच नाव लौकीकात ही भर पडेल,असे गौरवोदगार महापौर दत्तात्राय धनकवडे यांनी काढले.नळ स्टॉप चौकातील समुद्रा हॉटेल शेजारी व शौकीन पानस्टाल समोरील पुरुष स्वच्छतागृहास गत वर्षी बांधकाम व्यवसायिक संजय देशपांडे यांनी स्वच्छ ठेवण्याचा विडा उचलला,या उपक्रमास एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मा.महापौर बोलत होते.या वेळी खा.वंदना चव्हाण,आ.मेधा कुलकर्णी,स्थानिक नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे,भाजप चे सरचिटणीस संदीप खर्डेकर,घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप,क्षेत्रीय आयुक्त सुनील केसरी,इ उपस्थित होते,श्री.संजय देशपांडे म्हणाले”रोज या ठिकानाहून जाताना येणारा घाणेरडा वास मला अस्वस्थ करत होता,याबाबत फक्त चर्चा न करता कृती करण्याचे ठरविले आणी या उपक्रमाने आकार घेतला. मी या उपक्रमाबाबत अनेक मित्रांशी चर्चा करत असतो,त्यातूनच श्री.आदीत्य जावडेकर व श्री,विक्रांत वर्तक यांनी ही प्रत्येकी एक स्वच्छतागृह दत्तक घेण्याचे मान्य केले आहे असे ही त्यांनी जाहीर केले.
नागरी सहभागातून स्वच्छतागृह स्वच्छ राखण्याच्या उपक्रमाची वर्षपूर्ती.
Date:
नळ स्टॉप चौकातील समुद्रा हॉटेल शेजारी व शौकीन पानस्टाल समोरील पुरुष स्वच्छतागृह अन्य
सार्वजनिक स्वच्छतागृहांप्रमाणेच अस्वच्छ व उग्र दुर्गंधियुक्त असे होते.अगदी रस्त्यावरून वाहनावरून जरी
गेले तरी दुर्गंधी ने नकोनकोसे व्हायचे.गत वर्षी बांधकाम व्यवसायिक संजय देशपांडे यांनी हे स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्याचा विडा उचलला आणि खा.वंदना चव्हाण आणि संदीप खर्डेकर यांनी तत्कालीन आयुक्त महेश पाठक यांच्याकडे पाठपुरावा करून या उपक्रमास मान्यता मिळवून दिली.श्री.संजय देशपांडे यांनी एक सफाई कामगार नेमून त्याला महिन्याचा पगार ठरवून देऊन सदर स्वच्छतागृह चकाचक ठेवण्याचे आव्हान स्वीकारले आणि आता या उपक्रमास एक वर्ष पूर्ण होत आहे,यानिमित्त हा समारंभ आयोजित केला आहे,असे संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.खा.वंदना चव्हाण म्हणाल्या प्रशासनाने या उपक्रमाबाबत लालफीतिशाही चा कारभार न करता नागरिकांना असा उपक्रम सुरू करण्यास प्रोत्साहित करावे जेणेकरून पुण्यातील अनेक ख्यातनाम संस्था/व्यक्ती/व्यापारी यापासून प्रेरणा घेतील व असे अन्य स्वच्छतागृह दत्तक घेऊन त्याद्वारे आपले शहर अधिक स्वच्छ कसे होईल यासाठी प्रयत्न करतील असे ही त्या म्हणाल्या.तसेच लवकरच शहरातील बांधकाम व्यवसायिक,व्यापरी संघ,मराठा चंबर ओफ कॉमर्स,व अण्या संस्थांच्या बैठका घेऊन त्यांना या उपक्रमात सहभाग घेण्याविषयी मी व संदीप खर्डेकर पुढाकार घेऊ असे ही त्यांनी संगितले.प्रा.मेधा कुलकर्णी यांनी “कोथरूड भागातील बागांमध्ये असे उपक्रम तातडी राबविण्याचा अपण प्रयत्न करू,कारण येथे मोठ्या प्रमानावर नागरिक येतात व येथील स्वच्छता हा एक गंभीर प्रश्न आहे,असे सांगतानाच स्वच्छता हा केवल प्रशासनावर आवलंबून राहण्याचा विषय नसून नागरिकांनी सुद्धा याबाबत जागरूक राहून आपले योगदान देणे गरजेचे आहे,व त्यासाठी कोथरूड भागातील प्रतिष्ठितांची बैठक घेऊन असा उपक्रम माझ्या मतदारसंघात राबविण्याबाबत मी प्रयत्न करेन असे ही त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक नगरसेविका माधुरी ताई सहस्त्रबुद्धे यांनी या संकल्पनेचे शिल्पकार संजय देशपांडे यांचा गौरव करताना या उपक्रमाची सुरुवात माझ्या प्रभागातून झाली असली तरी संपूर्न शहारात हा उपक्रम राबविला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली,
या वेळी परिसरतील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.संजय देशपांडे यांनी प्रास्ताविक तर संदीप खर्डेकर यांनी सूत्र संचालन केले.