नवी दिल्ली-केंद्र सरकारने परदेशी बँकांमधील काळ्या पैसा साठविणाऱ्या तीन भारतीयांची नावे सुप्रीम कोर्टाकडे दिल्यानंतर आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज एकूण १५ जणांची नावं जाहीर केली. या यादीत रिलायन्स उद्योगसमुहाचे प्रमुख मुकेश अंबानी, अनिल अंबानी, जेट एअरवेजचे प्रमुख नरेश गोयल या देशातील बड्या उद्योगपतींच्या नावांचा समावेश आहे. मोदी सरकारने निवडक लोकांचीच नावं जाहीर केली असून जे शक्तिशाली उद्योगपती आहेत त्यांची नावं गुप्त ठेवली असल्याचा आरोप केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत केली.
काळा पैसा परदेशी बँकांमध्ये ठेवणाऱ्या सर्वच्या सर्व ८०० जणांची नावं सरकारने जाहीर केल्यास खऱ्या अर्थाने स्वच्छ भारत अभियान सुरु होईल असं केजरीवाल म्हणाले.
केंद्र सरकारने ‘स्वच्छ भारत अभियाना’त देशभरात एकूण ९ अॅम्बेसेडर जाहीर केले असून त्यातील एक जणाचे खाते असल्याचे केजरावील म्हणाले. परंतु ते पंतप्रधानांच्या जवळ असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला.
दरम्यान केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सोमवारी सादर केलेल्या काळे पैशेवाल्यांच्या यादीत राजकोटचे व्यापारी पंकज चिमनलाल लोढिया यांच्या नावाचा खुलासा झाला आहे. लोढिया यांचे स्विस बँकेत खाते असल्याचे समोर आल्यानंतर ते चर्चेत आले आहेत. राजकोट आणि सौराष्ट्र येथे रियल इस्टेट आणि सोने-चांदीचे मोठे व्यापारी असलेले श्रीजी ट्रेडिंग कंपनीचे मालक पंकज लोढिया यांनी आपल्याकडे काळेधन नसल्याचे म्हटले आहे. आपले नाव या यादीत आल्याने मलाच आश्चर्य वाटत असल्याचे ते म्हणाले.
ते म्हणाले, ‘आमची जेवढी संपत्ती आहे ती आम्ही प्रात्पिकर विभागाकडे जाहीर केलेली आहे.’ कर सल्लागारांसोबत चर्चा करून पुढे काय करता येईल हे ठरविणार असल्याचे, ते म्हणाले.
लोढिया यांच्या श्रीजी कंपनीचे मुंबई, पुणे, अहमदाबाद, सूरत, हैदराबाद, विजयवाडा, कोलकाता, जयपुर, कोच्ची आणि बंगळुरुसह अनेक शहरांमध्ये कार्यालय आहे. ही कंपनी सोन्याचे बिस्कीट आणि सोन्याचे दाणे यांचा गुजरात आणि सौराष्ट्रमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापर करते.याशिवाय प्रदीप बर्मन डाबर समुहाचे संचालक आहेत. तसेच राधा टिम्बलू गोवा येथी खाण व्यावसायिक आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काळा पैसा चौकशी प्रकरणामध्ये या तिघांशिवाय इतर चार काँग्रेस नेत्यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यात यूपीए सरकारच्या एका माजी राज्यमंत्र्यांचा समावेश असल्याची माहितीही मिळाली आहे.
नरेंद्र मोदी हे ;मुकेश- अनिल अंबानींचे नाव दडवत आहेत -केजरीवाल
Date: