पुणे :
मेळघाट परिसरात वैद्यकीय आणि सामाजिक कार्य करणाऱ्या डॉ रवींद्र कोल्हे ,डॉ स्मिता कोल्हे यांचा डॉ भा ल ठाणगे , रामभाऊ इंगोले यांच्या हस्ते ‘सर फाऊंडेशन’ आणि ‘डीपर’ या स्वयंसेवी संस्थांच्या वतीने पालक दिनी पुण्यात महापालक सन्मान सोहळ्यात महापालक सन्मान देवून सत्कार करण्यात आला
यशवंत राव चव्हाण नाट्य गृहात हा कार्यक्रम झाला सामाजिक कार्यकर्ते डॉ भा ल ठाणगे ,रामभाऊ इंगोले यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा झाला . स्मृतीचींह ,एक लाख रुपये रोख, सन्मानपत्र, शाल-श्रीफळ असे या सन्मानाचे स्वरूप आहे.
. पालकदिनाचे महत्त्व रुजविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या सोहळ्याचे तिसरे वर्ष आहे
सामाजिक कार्यकर्ते डॉ कुमार सप्तर्षी ,डॉ उर्मिला सप्तर्षी ,अविनाश सावजी ,डॉ व्ही बी गायकवाड ,एड . प्रेमचंद पंडित ,लक्ष्मीकांत वरंगवकर ,विवेक वेलणकर ,डॉ श्रीराम गीत ,रोहिणी बुटले ,संदीप बर्वे ,साधना कुलकर्णी ,प्रवीण मोतेवार उपस्थित होते
‘ मेळघाट परिसरात जनहितार्थ सामाजिक काम करून कुपोषित माणसे जगविणारे कोल्हे दाम्पत्य हेच खरे साधू आहेत . . त्यांनी मनात आणले असते तर शहरात मोठे इमले उभे केले असते . त्यांचा आदर्श डॉक्टर मंडळीनी घेतला पाहिजे ‘ असे प्रतिपादन रामभाऊ इंगोले यांनी केले
‘दुर्गम भागात तज्ञ डॉक्टर मंडळी काम करण्याचे प्रमाण अजून कमी असून मेळघाट मध्ये अजून डॉक्टरांच्या कामाची गरज आहे ‘ असे प्रतिपादन डॉ रवींद्र कोल्हे यांनी केले
आधीच्या वर्षीचे पुरस्कार विजेते पुढील वर्षीच्या पुरस्कार्थींची निवड करतात. 2013 चे पुरस्कार्थी डॉ. प्रकाश आमटे, व डॉ. मंदाकिनी आमटे आणि 2014 चे पुरस्कारार्थी डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. उर्मिला सप्तर्षी यांनी कोल्हे दांपत्याची निवड केली आहे.
या सन्मान सोहळ्यात पालकत्त्वाला वाहिलेल्या ‘तुम्ही आम्ही पालक’ या मासिकाचा दुसरा वर्धापन दिन निमित्त तृतीय वर्षाच्या पहिल्या अंकाचा प्रकाशन झाले
‘डीपर’चे 10 व्या वर्षात पदार्पण होत असून, वैद्यकीय व इंजिनिअरींगच्या सीईटीमध्ये प्रथम येणार्या डीपरच्या विद्यार्थ्यांचा सत्कार व गरजू विद्यर्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी साहाय्य प्रदान करण्यात आले . तसेच यावेळी स्कॉलरशिप सराव परीक्षा महाएक्झामध्ये प्रथम येणार्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला
‘साद माणुसकीची-संपत्ती सहयोग ते संपत्ती दान’ चर्चासत्र
दुपारच्या सत्रात ‘साद माणुसकीची-संपत्ती सहयोग ते संपत्ती दान’ या चर्चासत्राचे आयोजन 2 ते 6 या वेळेत करण्यात आले होते . हे चर्चासत्र‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन’ जे.पी.नाईक सेंटर, कुंबरे पार्क शेजारी, ‘एकलव्य पॉलिटेक्निक’च्या मागे, कोथरूड येथे झाले चर्चासत्रा विषयीच्या संकल्पनेचे सादरीकरण हरीश बुटले (संस्थापक डिपर व सर फाऊंडेशन) यांनी तसेच अरूण कुंभार संकल्पनेच्या तांत्रिक बाबी सांगितल्या . यामध्ये प्रदीप लोखंडे (संस्थापक रूरल रिलेशन्स, पुणे), नरेश झुरमुरे (उपव्यवस्थापकीय संचालक, यशदा), डॉ. गिरीश कुलकर्णी (स्नेहालय अहमदनगर), विवेक वेलणकर (अध्यक्ष सजग नागरिक मंच), अॅड.असीम सरोदे, डॉ. अविनाश सावजी (संस्थापक प्रयास व सेवांकुर, अमरावती), अनिल धनेश्वर हे मान्यवर सहभागी झाले . डॉ. श्रीराम गीत, बाबासाहेब माने यांनी चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले
———————————-