छत्रपतींचा आशीर्वाद , चला देवू मोदींना साथ या भाजपच्या जाहिरातीची खिल्ली आज उद्धव ठाकरे यांनी उडविली
… अरे दिली होती तुम्हाला साथ , पण तुम्ही लाथ दिली , छत्रपतींचा आशीर्वाद मागता आहात त्याच छत्रपतींची शिकवण आहे आम्हाला दिल्ली पुढे झुकायचे नाही म्हणून अशी पुन्हा एकदा भाजपवर टीका करीत आणि त्याबरोबर पृथ्वीराज चव्हाणांवर हि आसूड ओढीत शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र एल बी टी मुक्त करू आणि टोल मुक्त हि करू त्याबरोबर जकातीची आकारणी प्रणाली हि सुसह्य अशी करू अशी घोषणा आज बोरीवली येथे झालेल्या सभेतूनकेली
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कावर दरवर्षी जल्लोषात व उत्साहात साजरा होतो. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून येणारे लाखो शिवसैनिक विचारांचे सोने लुटतात. शिवसेनेची ही वैभवशाली परंपरा शिवसेनेच्या स्थापनेपासूनच चालत आली आहे. मात्र या वर्षी विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे यंदा दसरा मेळाव्याऐवजी शिवाजी पार्कावर शिवसेनेने केवळ शस्त्रपूजन करून दसर्याचा उत्सव साजरा केला. आणि बोरीवली येथे सभा घेतली
यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका करताना ठाकरे म्हणाले , मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यावर पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत , पृथ्वीराज चव्हाण म्हणत आहेत सिंचन घोटाळा बाहेर येईल म्हणून आघाडी तोडली ,आणि अजित पवार म्हणत आहेत सहा महिन्यातील पृथ्वीराज चव्हाण यांच्या कामाची चौकशी झाली पाहिजे . आता आम्हीच सत्तेवर आल्यावर यांचा भ्रष्टाचार बाहेर काढू . जर सिंचन घोटाळ्याची फाईल चव्हाणांकडे होती तर का नाही अजित पवारांची त्यांनी ‘जयललिता ‘ केली?का पांघरून घातले या घोटाळ्यावर ? काय दोघे घोटाळ्याची रक्कम आर्धी- आर्धी वाटून घेणार होते? श्वेत पत्रिका वगैरे सारी नाटके केली यांनी … आणि चव्हाण यांनी हि सहा महिन्यात कुठे कुठे सह्या केल्या काय कामे केली ती सारी आम्ही बाहेर काढू , काँग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्राला लुटलंयअसेही ते म्हणाले
भाजपने २५ वर्षांची असलेली युती तोडली हे देशभरातील हिंदुत्ववादी लोकांना आवडलेले नाही . अच्छे दिन आल्यावर यांनी २५ वर्षांची साथ सोडली ते आता कोणाकोणाला घेतले बरोबर त्यांचे काय करणार ते त्यांनीच पाहावे असे ते म्हणाले
एलबीटी मुक्त आणि टोलमुक्त महाराष्ट्राची उद्धव ठाकरे यांची घोषणा
Date: