उग्र आणि मुजोर जातीयवाद पराभवाच्या दिशेने… प्रा . हरी नरके

Date:

hari narke
(लेखक -प्रा . हरी नरके )
सर्वप्रथम मी या सत्तांतराचे जाहीरपणे स्वागत करतो. विजयी मंडळींचे अभिनंदन करतो आणि पराभुतांचे सांत्वन करतो.
राज्याच्या सत्तेचा चेहरा बदलतोय. तो अधिक सर्वसमावेशक होतोय. बहुजनवादाचा बुरखा घालून पेरलेला उग्र आणि मुजोर सत्ताधारी जातीयवाद पराभवाच्या दिशेने जाताना दिसतोय. काही मस्तवाल नी जातीयवादी नेत्यांना लोकांनी नाकारले आहे. नवे जागृत मतदार तयार होत आहेत. आम्हाला गृहीत धरणे आणि विद्वेषासाठी वापरून घेणे गेले ५०वर्षे चालूये, ते आम्ही यापुढे खपऊन घेणार नाही, असे सांगत विद्यमान जातीय मतब्यांकांना भगदाडे पडत आहेत. पैसा, पेड माध्यमांचा उपयोग करणे, “नोटा”चा वापर, हे वाढत आहेत. मतदारांनी निर्धार केला तर काही मुजोर जातीयवादी असे सरदार, मनसबदार, जहागिरदार, पाटील, देशमुख आणि संस्थानिक पराभूतही होऊ शकतात. पर्याय असेल तर मतदार नक्की तिकडे वळतात, असे राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होते असे मला वाटते.
सत्यशोधक चळवळीच्या पुण्याईवर महाराष्ट्राचा सामाजिक चेहरामोहरा बदलला गेला. त्याचेही एक समाजशास्त्रीय महत्व जरूर होते. मात्र लवकरच निवडणुकीच्या तंत्रावर पकड मिळवलेल्या सत्ताधारी, उग्र आणि मुजोर जातीयवादी टोळ्यांनी बहुजनवादाचा मूळ विचार आणि सामाजिक ध्येयवाद बाजूला ठेऊन शिवछत्रपती आणि फुले-शाहू-आंबेडकर यांचे केवळ नामस्मरण करीत वाटचाल सुरू केली. त्यांना या महापुरूषांच्या विचारधारेशी काहीही देणेघेणे नव्हते. वापर तेव्हढा करायचा होता. ही केवळ तोंडपाटीलकी होती. त्यातून सत्तेचा पाया आकुंचित झाला. एकजातीय चेहरा आक्रमक बनू लागला. पण हे लोक चतूर असल्याने त्यांनी चोराच्या उलट्या बोंबा या न्यायाने विरोधी छावणीच जातीयवादी असल्याचा जोरदार डांगोरा पिटला. राज्यात तीनचार समाजाच्याच संघटित मतब्यांका होत्या. त्याच्या जोरावर कधी त्यात युतीच्या नावावर आघाडी नी आघाडीच्या नावावर युती करण्यात आली नी सत्तेच्या चाव्या नी तिजोर्‍या कब्ज्यात ठेवण्यात आल्या. १९८० च्या दशकात प्रथमच नव्या जाणीवांचा मतदार तयार होऊ लागला. १९९५ ला त्याचा परिणामही दिसला. पण त्याला अवघ्या ५ वर्षात कोप्च्यात ढकलण्यात जुनेजाणते यशस्वी झाले. त्यानंतर गेल्या १५ वर्षात राज्य ज्या दिशेने जात होते ती नवी मोगलाईच होती.
या निवडणुकीत जाहीरपणे विदर्भातील काही नेत्यांची नावे घेऊन राज्य “त्यांच्या” ताब्यात देणार काय? अशी उग्र जातीयवादी मांडणी केली गेली. तिला मतदारांनी धुडकाऊन लावले हे बरे झाले. बाबा-दादा-आबा परत आले असले तरी ते मतदारांनी दिलेल्या या फटकार्‍याचा गर्भित अर्थ समजू शकतील काय?
राज्यातील स्वत:ला पुरोगामी/परिवर्तनवादी म्हणवणार्‍या अनेक पढीक पंडीतांना राज्यातील सामान्य मतदारांना जे दिसते ते अजुनही दिसत नाही. हे महाभाग आजही १८१८ ते १९६० याच काळात वावरत आहेत. ते ज्यांना जातीयवादी म्हणून ठोकीत आहेत ते समावेशक बनलेत नी ज्यांना पुरोगामी म्हणून ते डोक्यावर मिरवीत आहेत ते जातीयवाद्यांचे आश्रयदाते नी पोशिंदे बनलेले आहेत. राज्याची शिक्षण, माध्यमे, प्रशासन, राजकारण या सगळ्यांची सुत्रे आज ज्यांच्या हातात एकवटली आहेत ते जेव्हा उघड नी जहरी जातीयवादाचे प्रवक्ते बनतात तेव्हा संतुलन ढासळते आणि मग परिवर्तन अटळ बनते. तथापि या परिवर्तनाचे आकलन करण्याची क्षमता विद्यमान तथाकथित पुरोगाम्यांकडे आहे काय? याचे उत्तर लवकरच मिळेल.
मी या सत्तांतराचे जाहीरपणे स्वागत करतो.
(लेखक -प्रा . हरी नरके )

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाश्चात्य संगीतापेक्षा शास्त्रीय संगीत आणि नृत्यातून वेगळा आनंद मिळतो

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची भावना पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाचे...

सोशल मीडियावर औरंगजेबाचं समर्थन: पुण्यात दोघांवर कारवाई

पुणे-राज्यभरात औरंगजेबच्या कबरवरुन राजकीय वाद सुरु असतानाच त्याचे गंभीर...