पाचगणी- रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होतअसलेल्या एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 12 वर्षाखालील सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात पुण्याच्या अर्णव पापरकर तर मुलींच्या गटात इकराजू कनूमुरी यांनी दुहेरीसह एकेरीतही विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुटाचा मान मिळवला.
पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत विजेतेपदासाठीच्या लढतीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या दुस-या मानांकीत अर्णव पापरकरने आपल्या लैकीकाला साजेशी खेळी करत तेलंगणाच्या पाचव्या मानांकीत चैत्रा गलीवेटी रेड्डी याच 6-4,3-6,6-3 असा तीन सेटमध्ये पराभव केला. अर्णवने पहिला सेट 6-4 असा जिंकल्यानंतर चैत्राने दुसरा सेट 3-6 असा जिंकत सामन्यात बरोबरी साधली मात्र अर्णवने आपले कैशल्य पणाला लावत तिसरा सेट 6-3 असा जिंकत विजेतेपद पटकावले.
मुलींच्या गटात तेलंगणाच्या अव्वल मानांकीत इकराजू कनूमुरीने महाराष्ट्राच्या आठव्या मानांकीत प्राप्ती पाटीलचा 6-0, 6-1 असा सहज पराभव करत विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सिने अभिनेते जावेद सनेसरा व एआयटीए सुपरवायझर वैशाली शेकटकर यांच्याहस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी: 12वर्षाखालील मुले:
अर्णव पापरकर(महा)(2)वि.वि. चैत्रा गलीवेटी रेड्डी(तेलंगणा)(5)6-4,3-6,6-3
मुली: अंतिम फेरी:
इकराजू कनूमुरी(तेलंगणा)(1)वि.वि. प्राप्ती पाटील(महा)(8)6-0, 6-1