पुणे: पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित तिसऱ्या आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018 स्पर्धेत अर्णव पापरकर , नील कोठारी, अर्चित धुत, मनन अगरवाल , स्वराज ढमढेरे , अभय नागराजन , मेहेक कपुर, प्रिशा शिंदे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 10 वर्षाखालील मुलांच्या गटात दुस-या फेरीत अव्वम मानांकीत अर्णव पापरकरने देवराज रेड्डीचा 6-0 असा एकतर्फी पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. चौथ्या मानांकीत नील कोठारीने भावेश पिलानीचा 5-2 असा तर सातव्या मानांकीत मनन अगरवालने विश्वजीत झनसचा 5-1 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
10 वर्षाखालील मुलींच्या गटात सातव्या मानांकीत मेहेक कपुर ईशा राठोडचा 5-1 असा तर आठव्या मानंकीत प्रिशा शिंदेने वृंदा सार्खाचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: फेरी: 10 वर्षाखालील मुले: दुसरी फेरी
अर्णव पापरकर(1) वि.वि देवराज रेड्डी 6-0
स्वराज ढमढेरे(9) वि.वि अंशुल देशपांडे 5-0
मनन अगरवाल(7) वि.वि विश्वजीत झनस 5-1
नील कोठारी(4) वि.वि भावेश पिलानी 5-2
सुर्या काकडे(12) वि.वि पृथ्विराज हिरेमत 5-2
अभय नागराजन(8) वि.वि स्वरनीम येवलेकर 5-0
अर्चित धुत(5) वि.वि अमोघ दामले 5-2
नमिश हुड(11) वि.वि अथर्व जोशी 5-2
10 वर्षाखालील मुली- पहिली फेरी
निहारीका घोशाल वि.वि सेजल इजनकर 5-3
रितिका कापरे वि.वि धान्या भंडारी 5-0
मेहेक कपुर(7) वि.वि ईशा राठोड 5-1
प्रिशा शिंदे (8) वि.वि वृंदा सार्खा 5-0