मुंबईः एकीकडे संपूर्ण बॉलीवूड आणि माध्यमे सलमान खान च्या जेलमधील रात्रीची आणि त्याच्या बेल ची चिंता वाहत असताना दुसरीकडे बॉलिवूडच्या ‘शोले’ सह असंख्य चित्रपटात भूमिका केलेल्या अभिनेते राजकिशोर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. गुरुवारी रात्री 1.30च्या सुमारास मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजकिशोर यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. यापैकी एक शोले हा चित्रपट होता. या चित्रपटातील लोकप्रिय दृश्यात राजकिशोर होते.राजकिशोर यांनी तहलका, शहजादी, फरिश्ते, एक नया रिश्ता, मारधाड, काला धंधा गोरे लोग, तन बदन आणि मिस्टर अँड मिसेज खिलाडी या चित्रपटांमध्ये झळकले होते.