पुणे : पुणेकरांच्या आनंदात भर घालण्यासाठी ‘अपसाऊथ’ या दक्षिण भारतीय क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट (क्यूएसआर) ब्रँडने पुण्यातील आपले पाचवे आऊटलेट लोहगावमधील पुणे एअरपोर्ट येथे सुरु केले आहे. आठवड्यातील सर्व दिवस चोवीस तास सुरु राहणाऱ्या या आऊटलेटचे उद्घाटन ‘एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया’(एएआय)चे (पुणे) संचालक अशोक कुमार यांच्या हस्ते, ‘एएआय’चे कमर्शियल विभागाचे सह सरव्यवस्थापक के. श्रीनिवास यांच्यासमवेत व अनेक प्रतिष्ठित पाहुण्यांच्या उपस्थितीत आज येथे झाले.
‘अपसाऊथ’ रेस्टॉरंटमध्ये अस्सल, चविष्ट खाद्यपदार्थ वेगवान सेवेसह आरोग्यपूर्ण वातावरणात दिले जातात आणि ते तयार होताना आपण बघूही शकतो. हे रेस्टॉरंट पदार्थ स्वतः घेण्याच्या (सेल्फ-सर्व्हिस) व ते बसून खाता येईल (सीट डाऊन) या प्रकारातील आहे. हे असे आदर्श ठिकाण आहे, जेथे विद्यार्थ्यांना पदार्थांचा आस्वाद झटपट घेता येईल, कुटूंबांना तोच आस्वाद शांतपणे बसून अनुभवता येईल आणि आपल्या गंतव्य स्थळी जाण्याची गडबड असणारे नोकरदार, विमानतळावर ये-जा करणारे लोक व प्रवाशांना येथे अगदी वेगाने सेवा मिळेल. ‘अपसाऊथ’ रेस्टॉरंट वैविध्यपूर्ण आणि दर्जेदार पदार्थ अगदी किफायती दरांत पुरवते. त्यांच्या मेनूमध्ये अत्यंत लोकप्रिय व जगभरात प्रसिद्ध झालेले अनेक पर्याय समाविष्ट आहेत. इडली व डोशांचे विविध प्रकार, मेदूवडा, उत्थप्पा, चटण्या व सांबार, फिल्टर कॉफी, पड्डू, मलबारी परोठा, दक्षिण भारतीय पदार्थांचे एकत्रीकरण (कॉम्बो), भोजन असे प्रकार येथे मिळतातच, शिवाय उथली, मलबारी परोठा सँडविच व साबुदाणा चीज वडा असे खास पदार्थ आणि उथली, अपसाऊथ बर्स्ट, मार्गारिटा, टोमॅटिनो असे अभिनव पदार्थ याबरोबरच काही लोकप्रिय उत्तर भारतीय पदार्थही येथे उपलब्ध आहेत. या पदार्थांच्या किंमती स्पर्धात्मक असून प्रतिव्यक्ती सरासरी खर्च केवळ ८० ते ९० रुपयांच्या घरात जातो. येथील पदार्थ पैशाचे पुरेपूर मूल्य देणारे आणि सर्वोत्तम दर्जाचे आहेत.
‘अपसाऊथ’ हा क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट (क्यूएसआर) हा भारतातील एक आघाडीची दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ, आतिथ्य साखळी असलेल्या ‘बिलियनस्माईल्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड’चा असून ‘अपसाऊथ’खेरीज ‘बॉनसाऊथ’, ‘साऊथइंडीज’, ‘अपसाऊथ एक्स्प्रेस’ हेही नामांकित ब्रँड्स त्यांच्या मालकीचे आहेत.
दक्षिण भारतीय शाकाहारी खाद्यपदार्थ आधुनिक व तत्पर फॉरमॅटमध्ये, तसेच उत्पादन व सेवेचा अत्यंत उच्च दर्जा राखून कमीतकमी वाजवी किंमतीत व सर्वाधिक आरोग्यपूर्ण वातावरणात देण्यासाठी ‘अपसाऊथ’ कटिबद्ध आहे. बड्या इंटरनॅशनल रेस्टॉरंट साखळींमध्ये जसे उच्च प्रक्रियाकृत पदार्थ औद्योगिक स्तरावर तयार केले जातात, तसे ‘अपसाऊथ’मध्ये नसते. येथील पदार्थ ताज्या घटकांपासून बनवले जातात.
पाश्चिमात्य देशांत प्रक्रिया केलेल्या पदार्थांच्या खाण्यातून पुढे स्थूलतेची प्रचंड मोठी समस्या आढळून येत आहे. या समस्येवर ताज्या घटकांपासून बनवलेले भारतीय पारंपरिक खाद्यपदार्थ उत्तम उपाय ठरतो. चविष्ट, परिपूर्ण असे दक्षिण भारतीय शाकाहारी खाणे पोटाला पचायलाही हलके असते.
यासंदर्भात ‘अपसाऊथ’चे कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह शेफ मनू नायर म्हणाले, की काळाशी सुसंगती राखून ‘अपसाऊथ’ने दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांच्या अनुभवाची नवी व्याख्या केली असून त्याला उत्साही आणि समकालीन रुप मिळवून दिले आहे. आम्ही आरोग्यपूर्ण, चविष्ट, ताजे आणि पोटभरीचे दक्षिण भारतीय शाकाहारी खाद्यपदार्थ आधुनिक अशा फॉरमॅटमध्ये सादर केले आहेत.
‘अपसाऊथ’ने विस्ताराची आकर्षक योजना आखली असून त्याअंतर्गत पुणे शहरात चालू वर्षअखेरपर्यंत आणखी अनेक आऊटलेट्स उघडली जाणार आहेत.
‘अपसाऊथ’मध्ये आम्ही नेहमीच ग्राहकांसाठी उच्च पातळीच्या वातावरणासह सोय, किफायत व दर्जा निर्माण करण्यासाठी परिश्रम घेतो. दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ हे सर्वाधिक लोकप्रिय भारतीय खाद्यपदार्थांपैकी असून दिवसभरात कोणत्याही वेळी खाण्यासाठी सुयोग्य उत्पादन ठरतात. न्याहारीपासून ते माध्यान्ह भोजन, सायंकालीन स्नॅक्स व रात्रीभोजनापर्यंत प्रत्येक खाण्यात त्याचा वापर होतो. त्यामुळेच ‘अपसाऊथ’ला एक यशस्वी क्यूएसआर फॉरमॅट देशभर उभारण्याची मोठी संधी आहे, अशी प्रतिक्रिया ‘बिलियनस्माईल्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड’चे उपाध्यक्ष कुमार गौरव यांनी व्यक्त केली आहे.