- शर्यतीत 450 विशेष व वंचित मुले व 100 अपंग (पॅराप्लेजिक) जवानांचा सहभाग
पुणे: स्पेक्ट्रम, अ लेडीज स्टडी ऑर्गनायझेशन यांच्या तर्फे 3 किमी 3 किमी विशेष व वंचित मुलांच्या आणि अपंग (पॅराप्लेजिक) जवानांच्या व्हील चेअर मॅरेथॉन शर्यतीचे आयोजन करण्यात आहे. हि शर्यत 13 जानेवारी 2018 रोजी सकाळी 7.30 ते 9 .30 या वेळेत पॅराप्लेज सेंटर, रेंज हिल्स येथे होणार आहे.
शर्यतीत एकूण 450 विशेष मुले व वंचित बालकांनी आपला सहभाग नोंदवला आहे तसेच 100 अपंग (पॅराप्लेजिक) जवानांनी सहभग नोंदवला आहे. या प्रसंगी जलतरण प्रकारातील पहिले ऑलंपिक सुवर्ण पदक विजेते श्री. मुरली पेटकर यांचा सन्मान करण्यात येणार असून ते या स्पर्धेसाठी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित असतील.