पुणे -पोलिसांनी सुरू केलेल्या हेल्मेट सक्ती विरोधात येत्या 3 जानेवारीला कृती समितीच्या वतीने हेल्मेट शिवाय दुचाकीवर जाऊन पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन ‘सविनय’ कायदेभंग आंदोलनकरण्याचा निर्धार आज हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीने जाहीर केला .यावेळी पुण्याचे पोलीस म्हणजे पांढऱ्या कपड्यातील दरोडेखोर आहेत असा जोरदार प्रहार हेल्मेटसक्ती च्या अनुषंगाने बोलताना माजी महापौर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केला .
पुणे पोलिसांनी मागील काही दिवसांपासून हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्या दुचाकीस्वारा विरोधात दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. 31 डिसेंबरला एकाच दिवसात पाच हजार दुचाकीस्वारांवर कारवाई करून नवीन वर्षात हेल्मेट शिवाय दुचाकी चालविणाऱ्या विरोधात कडक कारवाई चे धोरण आखले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे पुणेकरांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या हेल्मेट विरोधी कृती समितीने हेल्मेट सक्ती विरोधात येत्या तीन तारखेपासून सविनय कायदेभंग आंदोलन सुरू करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेतला आहे. तीन तारखेला सकाळी साडेनऊ वाजता पत्रकार भवन येथून हेल्मेट न घालता दुचाकी रॅली काढून पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांना हेल्मेट सक्ती करू नये यासाठीचे निवेदन दिले जाणार आहे.
या बैठकीला ग्राहक चळवळीचे नेते सुर्यकांत पाठक माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, अंकुश काकडे,मोहनसिंग राजपाल,, संदीप खर्डेकर, धनंजय जाधव, डॉ. शैलेश गुजर, बाळासाहेब रूनवाल, मंदार जोशी आदी उपस्थित होते.
हेल्मेटचा ऐच्छिक वापर असावा परंतु सक्ती नसावी ही भुमिका मांडण्यात आली. पहा आणि ऐका ..यावेळी सुर्यकांत पाठक आणि अंकुश काकडे नेमके काय म्हणाले …