‘व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिवल’ स्पर्धेचे उद्घाटन पं.प्रभाकर जोग, हर्षित अभिराज, मोहनकुमार भंडारी यांचा सत्कार
पुणे :
28 व्या ‘पुणे फेस्टिव्हल’ मध्ये निवेदिता प्रतिष्ठानच्या सहकार्याने रविवारी व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिवल स्पर्धा संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीने आणि युवा गायकांच्या दमदार सहभागाने रंगली बालगंर्धव रंगमंदीर येथे रविवारी दुपारी या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ व्हायोलिन वादक पंडित प्रभाकर जोग, संगीतकार हर्षित अभिराज, सहाय्यक पोलिस आयुक्त शशिकांत शिंदे, मोहनकुमार भंडारी, अनुराधा भारती यांच्या उपस्थितीत झाले.
या स्पर्धेत 150 स्पर्धक प्रथम फेरीत सहभागी झाले होते. 25 गायकांची अंतिम फेरी रविवारी दुपारी झाली. यावेळी सत्य भारती, अनुराधा शिंदे, अली हुसेन, धनंजय इंगळे, संदीप पाचवडकर, दीपक महाजन, श्रीकांत कांबळे, रफीक मणीयार उपस्थित होते .
संगीतकार हर्षित अभिराज, निळकंठ कुलकर्णी, प्रविण कन्नम, अली हुसेन यांनी परिक्षण केले. माधुरी ढमाले यांनी सुत्रसंचालन केले.