‘छोटे सायंटिस्ट ‘ स्पर्धेस प्रारंभ
पुणे :‘केपीआयटी’टेक्नॉलॉजीस लिमिटेड आणि ‘ज्ञान प्रबोधिनी ‘ यांचा संयुक्त उपक्रम असलेली ‘छोटे सायंटिस्ट ‘ स्पर्धेस १३ फेब्रुवारी रोजी ‘केपीआयटी’ चे अध्यक्ष रवी पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला.
स्पर्धेच्या उदघाटन समारंभास शेखर सोनसळे(‘केपीआयटीचे फॅसिलिटीज अँड लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट विभाग प्रमुख ) तुषार जुवेकर(कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी विभाग प्रमुख ,’केपीआयटी’ ) ,’ज्ञान प्रबोधिनी ‘चे प्रशांत दिवेकर ,स्पर्धा समन्वयक प्रकाश रणनवरे उपस्थित होते .
१३,१४ फेब्रुवारी रोजी पुण्यात होत असलेल्या मावळ -मुळशी तालुक्यातील २० शाळा ,पुणे महानगर क्षेत्रातील 10 शाळा ,पिंपरी -चिंचवड क्षेत्रातील ८ शाळा अशा 38 शाळा आणि २०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत .
१४ फेब्रुवारी रोजी ‘अटल टिंकरिंग लॅब’ च्या २० शाळा आणि १०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत .
ही स्पर्धा ‘केपीआयटी ‘कॅम्पस , हिंजवडी -फेज -३ येथे सुरु झाली आहे . स्पर्धेचे हे पाचवे वर्ष आहे. या उपक्रमात ‘वी -सॉल्व्ह ‘ ही समस्या परिहार स्पर्धा असून त्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थानिक परिसरातील समस्या देऊन त्यावर वैज्ञानिक उत्तर शोधण्यास,प्रकल्प करण्यास सांगण्यात आले आहे . विजेत्यांना सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र ,स्कुल बॅग ,व विजयी शाळांना ट्राफी देण्यात येणार आहे .
२०१२ मध्ये २० शाळांमध्ये ८०० विद्यार्थ्यांमध्ये सुरु झालेला हा उपक्रम १७७ शाळा आणि १५ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे . भारतातील २० शहरांमध्ये हा उपक्रम पोहोचला आहे .