भारती विद्यापीठ ‘आयएमईडी’ विद्यार्थ्यांची ‘इन्फोसिस’ ला अभ्यास भेट
पुणे :भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ‘आयएमईडी’ २१७ च्या विद्यार्थ्यांची ‘इन्फोसिस’ कंपनी(हिंजवडी)ला अभ्यास भेट आयोजित करण्यात आली होती . ‘ स्टुडंट कनेक्ट ‘ प्रोग्राम अंतर्गत ही अभ्यास भेट नुकतीच झाली.
या अभ्यास भेटीत एमबीए, एमसीए , बीबीए, बीसीए अभ्यासक्रमाचे विद्यार्थी सहभागी झाले. प्रा. दीपक नवलगुंद यांच्यासह प्रा.रणप्रित कौर, प्रा.स्वाती देसाई, प्रा.हेमचंद्र पाडळीकर, प्रा.वृषाली यादव, डॉ.आर. व्ही. महाडिक उपस्थित होते.डॉ. सचिन वेर्णेकर, श्री. जोसेफ यांनी मार्गदर्शन केले.