पुणे- पुण्याची सारी घाण, सारे कचरा डेपो पूर्वेलाच ,आमच्याच माथी मारणार असाल ..तर नको आम्हाला तुमची पुणे महापालिका .. ….तर स्वतंत्र महापालिकेसाठी हडपसरचा संघर्ष अटळ असेल … अशा आशयाचा स्पष्ट इशारा आज महापालिकेतील विरोधीपक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी दिला .
हडपसर रामटेकडी येथे कचरा डेपो करण्यास आज मुख्य सभेने मान्यता दिली. यावेळी राष्ट्रवादी आणि मनसे ने या प्रस्तावास विरोध केला तर भाजपा शिवसेना आणि कॉंग्रेस या पक्षांनी बहुमताने (मतदानाने )या प्रस्तावास मान्यता दिली . यावेळी या प्रस्तावास विरोध करताना राष्ट्रवादी ने दिलेली उपसूचना मतदानाने फेटाळून लावत कचरा डेपोचा हा विषय मंजूर करण्यात आला. राष्ट्रवादीने उपस्थित केलेल्या मुद्द्यांना कोणतेही उत्तर देण्यात आले नाही .
नेमके या वेळी चेतन पाटील तुपे काय म्हणाले हे त्यांच्याच शब्दात ऐका ….