पुणे-राष्ट्रीय तायची कुंगफू फेडेरेशन ऑफ इंडियातर्फे दुसरी राज्यस्तरीय तायची कुंगफू स्पर्धा येरवडाजवळील फुलेनगर येथे अतुर भवन मंगल कार्यालयामध्ये संपन्न झाल्या . या स्पर्धेमध्ये १५ जिल्ह्यातील वय ७ ते वय १५ या वयोगटातील २५० स्पर्धकांनी भाग घेतला .या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पुणे जिल्ह्यातील सम्राट कांबळे , प्रदीप शिवपुंजे , व्दितीय क्रमांक ऑल इंडिया कुंगफू संघाचे संदीप कुंजीर व सुनील खंडागळे यांनी पटकाविला . तर तृतीय क्रमांक कांगलेचा मार्शल आर्ट संघाचे समीर शेख व प्रदीप माने यांनी पटकाविला .
स्पर्धेमधील विजेत्या संघाना राष्ट्रीय तायची कुंगफू फेडेरेशन ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष अमित भारवासी व सरचिटणीस करण अस्वरे यांच्याहस्ते स्मृतीचषक , पदक व प्रमाणपत्रे देण्यात आली . यावेळी प्रमुख पाहुणे नगरसेविका शीतल सावंत , नगरसेविका राजश्री काळे , मीनल पंजवानी , इलियास शेख , गोपाळ सोळंकी , ऑल इंडिया कुंगफू संघाचे अध्यक्ष सी. एल. लामा , नविन वाघिले , अंजियानंद कांबळे , अँड्रो गजभिव , सचिन भिसे , स्वाती पटेकर , नितीन जाधव व पलाश साठे आदी मान्यवर उपस्थित होते .