पुणे-सामाजिक कार्यकर्ते शशिकांत म्हेत्रे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले व सामाजिक न्याय राज्य मंत्री यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले . या पुरस्कारामध्ये पंधरा हजार रुपये धनादेश , सन्मान चिन्ह , मानपत्र , शाल , श्रीफळ देउन सन्मानित करण्यात आले .
शशिकांत म्हेत्रे हे गेले अनेक वर्षांपासून सफाई कामगार नेते म्हणून काम करीत असून राष्ट्रवादी काँग्रेस सफाई मजदूरचे महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून काम केले आहे. मेहेतर वाल्मिकी समाजासाठी त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे . त्यांनी मेहेतर वाल्मिकी समाजाचे राज्यस्तरीय परिषद आयोजित केली होती . तसेच पुणे येथे ते वाल्मिकी समाजाच्या पंचायतमध्ये काम केले आहे . होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत , गरजुंना वैद्यकीय मदत त्यांनी केले आहे .
आपल्याला राज्यशासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्यामुळे आपण आनंदित झालो आहे . यापुढे देखील आपण समाजसेवेचा वसा चालू ठेवणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शशिकांत लक्ष्मण म्हेत्रे सांगितले