पुणे-मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ हे बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले. हा दिवस बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिनही आहे. या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. त्यानिमित्ताने पुणे मीडिया वॉच व सिध्दार्थ वाचनालय व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या वर्षी ” मराठी पत्रकार दिन ” सोहळा आयोजित करण्यात आला आहे . यंदाच्या सोहळ्याचे चौदावे वर्ष आहे . अशी माहिती पुणे मीडिया वॉचचे संचालक महेश जांभुळकर व सिध्दार्थ वाचनालय व ग्रंथालयचे ग्रंथपाल दिलीप भिकुले यांनी दिली.
नवी पेठमधील गांजवे चौकाजवळील पुणे श्रमिक पत्रकार भवनमध्ये येत्या रविवारी ६ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजता व्याख्यान व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे . व्याख्यानामध्ये ” बदलते तंत्रज्ञानांचे माध्यमासमोरील आव्हाने ” या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संज्ञापन व वृत्तपत्रविदया विभागाचे सहाय्यक प्राध्यापक संजय विष्णू तांबट यांचे व्याख्यान होणार आहे .
पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यामध्ये नामदेव ढसाळ पत्रकारिता पुरस्कार हा सुगावा प्रकाशनचे प्रकाशक व दै. बहुजन महराष्ट्र वृत्तपत्राचे संपादक विलास वाघ , बाळासाहेब ठाकरे प्रभावशाली व्यंगचित्रकार पुरस्कार हा पुणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग , पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार हा गेली ५० वर्षापासून दै . आज का आनंदचे व दै संध्यानंदचे संस्थापक संपादक श्याम अग्रवाल , उत्कृष्ट जनसंपर्क पुरस्कार हा गेली ३० वर्षांपासून जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असलेले ” अक्षरकला ” या जनसंपर्क संस्थेचे संचालक प्रविण वाळिंबे , उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार दै. इंडियन एक्सप्रेसचे वृत्तपत्र छायाचित्रकार आरुल होरायझन , उत्कृष्ट इलेट्रॉनिक माध्यम पुरस्कार माय मराठी वेब मीडियाचे संपादक शरद लोणकर , उत्कृष्ट उपसंपादक हा दै. पुण्यनगरीचे उपसंपादक अशोक बालगुडे , उत्कृष्ट गुन्हे वार्तांकन पुरस्कार हा दै. पुणे मिररच्या पत्रकार अर्चना मोरे , प्रदीप रणपिसे राजकीय पत्रकारिता पुरस्कार हा दै आज का आनंदचे पत्रकार शैलेश काळे , उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दै. केसरीचे पत्रकार स्वप्नील पोरे , उत्कृष्ट क्रीडा पत्रकारिता पुरस्कार हा दै. सकाळ टाइम्सचे अश्व शर्यतीचे पत्रकार व पुणे रेसिंग जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मुनीर सय्यद , उत्कृष्ट उपनगर वार्ताहर हा दै. लोकमतचे उपनगर वार्ताहर प्रमोद गव्हाणे , सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालय पुरस्कार हा भवानी पेठमधील सापिका येथील हिंद बाल समाज मंडळ ट्रस्ट संचालित ज्योती वाचनालय , उत्कृष्ट वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार हा वानवडी येथील श्रीगणेश न्यूज पेपर एजन्सीचे संचालक अतुल भुजबळ आदींचा सन्मान स्मृतिचिन्ह , शाल व पुष्पगुछ देउन सन्मानित करण्यात येणार आहे .