सांगवीत उत्साहात दीपोत्सव
पिंपरी-
जुनी सांगवीतील श्री गजानन महाराज मंदिर, वेताळ महाराज मंदिर, मारूती मंदिर, तुळजाभवानी मंदिर, महानुभव मठ, विठ्ठल रुक्मिणी मंदिर आदि ठिकाणी आमदार लक्ष्मण जगताप मित्र परिवारातर्फे पाडव्यानिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन मंदीर परिसरामध्ये दीपोत्सवास सूरुवात करण्यात आली. यावेळी पाच हजार पणत्या प्रज्वलीत करण्यात आल्या. मंदीर परिसर प्रकाशाने उजळला होता. यावेळी नगरसेविका माई ढोरे, शारदा सोनवणे, नगरसेवक हर्षल ढोरे, शशिकांत कदम, संतोष कांबळे आदींसह नितीन खोडदे, दत्तात्रय येनपुरे, संतोष ढोरे, अरूण ढोरे, भजनी मंडळाचे अध्यक्ष शिवाजी ढोरे, हभप मनोहर पवार, राजाराम कड, अशोक ढोरे, सतपाल ढोरे, संयोजक जवाहर ढोरे, शरद ढोरे व गजानन महाराज सर्वन्यास मंडळाचे सदस्य उपस्थित होते.