पुणे-वैशाख वणव्याची दाहकता जणू चैत्रातच जाणवू लागते आणि विठ्ठलाच्या चंदन उटी पूजेला पंढरपुरात प्रारंभ होतो आणि दरवर्षीप्रमाणे श्री. विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तींना उन्हाळ्यातील उष्णतेचा दाह लागू नये यासाठी चंदन उटी लावण्यात येऊ लागते . या पुजेला गेल्या महिन्यात १९ मार्चला पंढरपुरात प्रारंभ झाला. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते मृग नक्षत्र निघेपर्यंत ही पूजा नित्यनियमाने केली जाते.हीच परंपरा विठुरायाच्या भक्तांनी कात्रजमध्ये सालाबाद प्रमाणे यंदाही नगरसेवक प्रकाश कदम यांच्या निवासस्थानी राबविली जाते .येथेहि विठुरायाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लाऊन पूजा केली गेली , आणि पंढरपूरच्या विठुरायाच्या नामघोषात भजन कीर्तनात वारकरी येथे रमला .
प्रकाश कदम हे भाविक म्हणूनदेखील सुपरिचित आहेत .त्यांच्या निवासस्थानी दरवर्षी उन्हाळ्यात असा वारकऱ्यांचा मेळा संपन्न होतो . आणि स्नेहभोजनाने या मेळ्याची सांगता होते. आज रात्री येथे भजन कीर्तनात रमलेल्या वारकऱ्यांची हि झलक … (टीप – वारकऱ्यांचा मेळा कात्रजमध्ये रमला : या व्हिडीओत प्रत्यक्ष पंढरपूरच्या विठोबाच्या मूर्तीचा समावेश केला आहे .)