शहिदांच्या कुटुंबांचे नंतर होते तरी काय ? किती काल समाज , देश त्यांच्या कुटुंबांची अवस्था पाहत रहातो .. असा सवाल शहीद सौरभ फराटे याच्या आईने अप्रत्यक्ष रित्या इथे उपस्थित केला .
युएसके फाऊंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्कार आणि ऊर्जा पुरस्काराचे वितरण काल (सोमवारी) सायंकाळी झाले.शहीद फराटे कुटुंबाचा यावेळी पुरस्काराने सन्मान करण्यात आला .
यावेळी भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले, तर ऊर्जा पुरस्कारात ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या बडोदा संस्थानच्या राधिकाराजे गायकवाड, साहित्यातील योगदानाबद्दल लेखक चेतन भगत, नाट्य-चित्रपटसृष्टीतील कार्याबद्दल अभिनेते नसिरूद्दीन शाह, अभिनेत्री रविना टंडन, संगीत क्षेत्रातील कार्याबद्दल पं. शिवकुमार शर्मा, उद्योजिका अनुराधा देसाई, युवा उद्योजक अजिंक्य फिरोदिया, अनन्या बिर्ला, शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल विश्वजीत कदम, आरोग्य क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. परवेझ ग्रांट, टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे यांना ऊर्जा पुरस्कार 2017 ने गौरविण्यात आले. तर